अकोट (सारंग कराळे) – अकोट शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी लाखों रूपायांचा गुटखा पकडल्या नंतर आणखी एक मोठी कार्यवाही करतांना गोवंश प्राण्याचे एक हजार किलो मांस किंमत दोन लाख रुपये व गोवंशिये प्राण्याचे कातडे किंमत अंदाजे ४५ हजार रुपये तसेच मास कापण्यासाठी उपयोगात येणारे चार कुऱ्हाडी,सात सुरे,तीन लाकडी ठोकळे पाण्याचा निळ्या रंगाचा ड्रम असा एकूण जवळ पास अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राप्त माहिती नुसार अकोट शहरातील शौकत अली चौकाजवळील कुरेशी पुऱ्यातील एका मोकळ्या प्लॉट मध्ये चार ते पाच कसाई हे गोवंशिय प्राण्यांची बेकायदेशीर रीत्या कत्तल करीत असल्याची खात्री लायक माहिती अकोट शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे शोध पथकाला मिळाली असता पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड,पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गवई,पोलीस कर्मचारी संजय घायल,ताठे, नेवहारे, विजय सोळंके,गुड्डू पठाण,अघडते, राठी यांच्या पथकाने खाजगी वाहनाने जाऊन रेड केली असता तेथे शेख आरिफ शेख अन्सार आणि मोहमद अफसर मोहम्मद रहीम दोन्ही राहणार कुरेशी पुरा अकोट. हे अवैध गोवंशीय मास व गोवंशिय प्राण्याचे एकूण 45 नग चामडे यासह मिळून आले व इतर त्यांचे तीन साथीदार पळून जाण्यास यशस्वी झाले,त्यांचे नाव निष्पन्न झाले असता ते शेख हुशेन शेख सत्तार राहणार गवशिया प्लॉट अकोट,शेख जुमेर अहमद अब्दुल शादिक राहणार कसाई पुरा,मोबिन अहमद अब्दुल रहेमान राहणार कसाई पुरा दोन्ही आरोपीची पोलीस कस्टडी घेऊन पोलीस तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले.अ
कोट शहर पोलिसांनी अवैध कत्तल खाण्यावर कार्यवाही करून लाखो रुपयांचे गोवंश व कातडे जप्त केल्याने अवैध कत्तल खाणे चालवणारे हादरले आहेत आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन येथे प्राणी संरक्षण कायदा प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अधिक वाचा : तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत क्रीडा क्रीडापटूचा उत्स्फुर्त प्रतिसाद युवसेनेचे तेल्हारा मध्ये प्रथमच आयोजन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola