तेल्हारा दि :- युवा सेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने तालुका क्रीडा संकुल तेल्हारा येथे प्रथमच स्वातंत्र्यदिनी भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये 500 क्रिडा पटूंनी सहभाग घेतला होता विजेत्या स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले आयोजित स्पर्धेला सर्वच स्तरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने क्रीडापटूना या स्पर्धेतून नवी दिशा व प्रेरणा मिळाली.
युवा सेनेच्या वतीने तेल्हारा शहरात तालुका क्रीडा संकुल येथे प्रथमच मोठ्या प्रमाणात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उदघाटन तहसीलदार डॉ संतोष येवलीकर यांनी केले या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार देवरे साहेब ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल मल्ल , शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख राहुल कराळे शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड , आदींची उपस्थिती होती .युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दुरवस्था झालेल्या क्रिडा संकुल चा प्रश्न मार्गी लावण्याकरिता निवेदन व इतर माध्यमातून हा विषय लावून धरला. क्रीडा संकुल ला आवरभिंत व इतर सुविधा पुरविण्याकरिता मी प्रयत्न करेल असे उदघाटन प्रसंगी तहसीलदार डॉ संतोष येवलीकर यांनी सांगितले आयोजित स्पर्धेत 1600 मिटर रनिंग मध्ये प्रथम क्रमांक अमित दामोदर व्दुतीय क्रमांक अजय बोदडे तृतीय क्रमांक मोहनीश लोणारे यांनी पटकावला .
१०० मीटर रनिंग मुली मध्ये प्रथमक्रमांक प्रियंका पिंजरकर दुव्तीय क्रमांक छाया वानखडे व तृतीय क्रमांक काजल सरदार या मुलींनी पटकावला .१०० मीटर रनिंग मुलामध्ये प्रथम क्रमांक प्रथमेश तारमेकवार दुतीय क्रमांक सचिन वानखडे तृतीय क्रमांक मोहनीश लोणारे या स्पर्धकाने पटकवला .गोळा फेक मध्ये प्रथमक्रमांक मयूर मलिये दुतीय क्रमांक मनीष येणकर तृतीय क्रमांक अजय अहेरकर या स्पर्धकांनी पटकावला .या स्पर्धा मध्ये पंच म्हणून प्रा लोणकर ,प्रा योगेश कोरपे ,शांतीकुमार सावरकर ,बाळासाहेब कौसल ,नितन मंगळे ,अतुल दबडघाव ,राजेंद्र कोरडे ,प्रदीप राऊत ,आदींनी काम पहिले .यावेळी स्पर्धेस्थळी स्व.इंदिरा गांधी पतसंस्था रुग्णवाहिका व ग्रामीण रुग्णालयाच्या चमूने वैद्यकीय सेवा पुरवली हि स्पर्धा यशस्वी करण्याकरिता युवासेनेच्यासर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले .
हेही वाचा : तेल्हारा न.प.आवारात भरदिवसा लाईटांचा झगमकाट,न.प.चा भोंगळ कारभार खुद्द कार्यालयासमोर दिसता झाला