अकोला – महाराष्ट्र राज्यात स्वातंत्र्य पूर्वीपासून अश्यपृष्य असलेल्या धोबी समाजाला भारतीय राज्य घटनेने मागासवर्गीय प्रवर्गात नोंद करून धोबी समाजाला आरक्षण दिले होते मात्र किरकोळ चूक असलेल्या कारणांवरून धोबी समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गात टाकून समाज विकास थांबविला आहे हा धोबी समाजावर अन्याय असल्याची जाणीव धोबी समाजाला झाल्यानंतर धोबी समाजाला मागासवर्गीय प्रवर्गात पुन्हा घेण्यात यावे यासाठी धोबी समाज आरक्षण कृती समितीचे वतीने 18 ऑगस्ट ला ठिय्या आंदोलन चे आयोजन केले होते परंतु माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दुःखद निधन झाल्याने राष्ट्रीय शोक पाळला जात असून या शोक मध्ये धोबी समाज सहभागी आहे त्यामुळे नियोजित 18 ऑगस्ट चा ठिय्या आंदोलन स्थगिती देऊन हे आंदोलन 24 ऑगस्ट ला होणार आहे गेल्या 18 वर्षे पासून धोबी समाज च्या वतीने सतत लढा सुरू आहे मात्र शासनाने अजूनही या समाजाकडे लक्ष दिले नाही.
सध्याच्या महाराष्ट्र सरकारच्या काळात आंदोलन केल्याशिवाय काहीच मिळत नसल्यामुळे मराठा,धनगर, मुस्लिम समाज व इतर जाती प्रमाणेच धोबी समाजालाही आता प्रारंभी ठिय्या आंदोलन करावे लागत आहे त्यानुसार येत्या 18 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो धोबी समाज बांधवांच्या उपस्थिती मध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती परंतु राष्ट्रीय शोक असल्याने हे आंदोलन स्थगित करून 24 ऑगस्ट ला हे आंदोलन होणार आहे.
अशी माहिती धोबी समाज आरक्षण कृती समिती प्रदेशाध्यक्ष अनिल शिंदे,मगेश केनेकर बाबुराव बेलूरकर,चद्रकात थुंकेकर, मनोज दुधाडे ,उल्हास मोकडकर,अरविंद तायडे ,रमेश थुंकेकर ,वामनराव कवडे, बंडू मोडोकार, सचिन शाहकार, दादाराव बाभुळकर, विलास चादुरकर ,गोपाल मोकडकर, केनेकर गूरुजी, प्रदीप निबाडकर, निपेश चाहाकर, सुधिर शेवणे, रुपेश चाहकर, आकाश कवडे, अमोल थुंकेकर ,योगेश कडतकर, रूषिकेश जामोदे , सागर अतरकर, सुनिल कैसकर आदीनी दिली आहे.
हेही वाचा : अकोला येथे ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा थाटात शुभारंभ