इंग्लंडकडून पहिल्या दोन कसोटीत लाजिरवाणा पराभव भारतीय संघावर चाहते आणि माजी खेळडूंकडून जोरदार टीका सुरु आहे. त्यातच भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग ने आपला मोर्चा अष्टपैलू म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या हार्दिक पांड्याकडे वळवला. त्याने हार्दिकच्या दोन्ही टेस्टमधील कामगिरीचा खरपूस समाचार घेत पांड्याला ऑल राउंडर म्हणून संबोधणे बंद करायला हवे, असे वक्तव्य केले आहे.
हार्दिकच्या या अपयशावर बोट ठेवत हरभजन सिंग म्हणाला की, पांड्याने फलंदाज म्हणून निराशा केली आहे. तसेच गोलंदाजी करताना त्याची कामगिरी म्हणावी तशी झालेली नाही.
गोलंदाज म्हणून कर्णधाराचा त्याच्यावर विश्वास नसल्याचे दिसून येते.’ हरभजन सिंग इंग्लंडच्या तीन ऑल राउंडरचे उदाहरण देत म्हणाला ‘हार्दिक पांड्या जर या अनुकुल वातावरणात गोलंदाजी करु शकत नाही तर त्याचे संघातील स्थान भविष्यात धोक्यात येऊ शकते. आपण त्याच्यावर लावलेला ऑल राउंडर हा टॅग काढून घ्यायला हवा. ज्याप्रमाणे इंग्लंडच्या तिन्ही ऑल राउंडरनी जशी कामगिरी केली तशीच कामगिरी हार्दिक पांड्याकडून अपेक्षित आहे. तो एका रात्रीत कपिल देव होऊ शकत नाही.’
अधिक वाचा : Asian Games 2018 : नीरज चोप्रा करणार भारतीय संघाचे प्रतिनिधित्व