भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७) अजित वाडेकर यांचे बुधवारी कर्करोगाने निधन झाले. त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
१९६६ ते १९७४ या कालावधीत वाडेकर यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ‘वन डाऊन’ फलंदाजी करणारे वाडेकर भारताच्या सर्वोत्तम स्लीप फिल्डर्सपैकी एक होते.
वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळविले. परदेशात कसोटी मालिका जिंकणारे वाडेकर हे पहिलेच भारतीय कर्णधार ठरले. याशिवाय, भारताच्या पहिल्या ‘वनडे’ संघाचेही ते सदस्य होते.
त्यांना १९६७ मध्ये ‘अर्जुन’, तर १९७२ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. निवृत्तीनंतर १९९० च्या दशकात वाडेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले होते.
कसोटी संघाचे सदस्य, कर्णधार, व्यवस्थापक आणि निवड समितीचे अध्यक्षपद अशी सर्व ठिकाणी कामगिरी केलेल्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये वाडेकर यांचा समावेश होतो. वाडेकर यांच्याशिवाय लाला अमरनाथ आणि चंदू बोर्डे यांनीच अशी कामगिरी केली आहे.
अधिक वाचा : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola