अकोट (सारंग कराळे) अकोट शहर पोलीसांनी मराठा आंदोलनादरम्यान 700 मराठा आंदेलकावर पोलीस अधीक्षक याच्या आदेशाचे उल्लघन व नागरीकाच्या घटनादत्त सचांर स्वातंञ्याचा भंग केल्याने कायदेशीर कारवाई करीत गुन्हे दाखल केले तेव्हा अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे कुठे होते ? शातंतेच्या मार्गाने आंदोलन करुन 3 रुग्णवाहीकेला रस्ता मोकळा करुन देत आदोंलनादरम्यान परीसर स्वच्छ करुन आंदोलन अनुशासीत असल्याचे पुरावे मराठा आंदोलकानी सादर केले तरी गुन्हे दाखल होणे खेदजनक बाब आहे.
या सदंर्भात अचलपुरचे कर्तव्यदक्ष आमदार बच्चु भाऊ कडु यांनी पोलीस अधीक्षक याची भेट घेऊन आंदोलनाबाबत वास्तविकेतेची जाण करुन दिली व त्यानतंर मुख्यमंञी कडे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन मुख्यमंञ्यानी आमदार बच्चु कडु यांना दिले त्यानतंर अचानक अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना जाग आली व त्यानी आपला राजकीय घाटा नफा दिसताच ताबडतोब अकोट येथे निवासस्थानी पञकार परीषेद घेऊन शासनाला बदनाम करण्याकरीता अकोट शहर पोलीस निरीक्षक गजानन शेळंके याना टार्गेट करीत त्यानी कोणाच्या इशार्यावर गुन्हे दाखल केले असा गभींर आरोप केला आहे (1)पोलीस प्रशासन कोणाच्या इशार्यावर चालते का ?जर चालत असेल तर गंभीर बाब आहे भाजपाचा जनाधार कमी करण्याचा प्रयत्न करीत कटकारस्थान झाल्याचा आरोप भारसाकळे यांनी केला आहे.
एक सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना संपुर्ण पोलीस प्रशासन याच्याच अधीन आहे शहरासह राज्याची कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी गुहमंञी तथा मुख्यमंञी फडणवीस साहेब याच्या कडे असताना मराठा तरुणानाच्या खाद्यावर बंदुक ठेवुन मराठा युवकाच्या नावाने आगामी ,सण,उत्सवाच्या काळात अकोट शहरात शातंता कायदा सुव्यवस्थेच्या दुष्टीने घातक आहे काही वर्षापासुन शांतअसलेल्या अकोट शहरातील वातावरण विचलीत करण्याचा ? धाक दाखवुन मराठा युवंकाना आमदार प्रकाश भारसाकळे आपल्या राजकीय फायद्या करीता बदनाम कींवा टार्गेट करुन तर देत नाहीत ना ? की अकोट शहर पोलीस निरीक्षक श्री गजानन शेळके याच्या डोक्यावर खापर फोडुन त्याची विकेट पाडण्याचा प्रयत्न तर नाहीना? हे सर्व विषय पण सशोंधनाचा भाग ठरु शकतात तरी वरीष्ठ अधिकार्यानी सखोल चौकशी करुन मराठा युवकाना वरील गुन्हे मागे घेण्यात यावे याचा राजकीय फायदा कोणी घेऊ नये असी सखल मराठा समाजाची मागणी आहे .