अकोट (सारंग कराळे) -स्थानिक शिवाजी चौकात वाहतूक पोलीस चौकी कार्यनवी त केल्या नंतर अकोट शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सोनू चौकातील व्यापारी सुदाम राजदे व त्यांचे कुटुंब ह्यांचे मदतीने सोनू चौकातील वाहतूक पोलिसांसाठी पोलीस चौकी कार्यनवयीत करून आज 15 ऑगस्ट च्या मुहूर्तावर सदर चौकीचे लोकार्पण उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, तहसीलदार विश्वनाथ घुगे,नगर अध्यक्ष हरिभाऊ माकोडे, नगर उपाध्यक्ष अबरार, पोलिस निरीक्षक गजानन शेळके,नगर पालिकेचे कार्यकारी अधिकारी प्रशांत रोडे साहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड ह्यांचे उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले, ह्या वेळी सदर पोलिस चौकी तयार करून देणारे सोनू चौकातील व्यापारी सुदाम राजदे,त्यांचे बंधू मदन राजदे, जवाहर राजदे,हरीश राजदे, सोनू चौकातील व्यापारी, नगर सेवक मंगेश लोणकर, गजानन लोणकर, पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते हजर होते, सोनू चौकातील वाहतुकीचे नियंत्रण करण्या साठी सकाळी 9 ते रात्री 9 वाजे पर्यंत वाहतूक पोलीस तैनात असतात परंतु त्यांना चौकात थांबण्या साठी कोणताही निवारा नसल्याने, ऊन, पावसा पासून सौरक्षण होण्या साठी सोनू चौकातील व्यापाऱ्यांनी पोलीस विभागाला मदत म्हणून पोलिस चौकी तयार करून स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये त्याचे लोकार्पण करण्यात आले