अकोट(सारंग कराळे)- मागील 15 दिवसात अकोट शहर व ग्रामीण भागात अवैध रित्या गुटख्या ची अवैध वाहतूक करणारे गुटखा माफिया वर अकोट शहर चे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनात अकोट शहर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धाड सत्र अवलंबून लाखोंचा गुटखा पकडला तसेच सतत धाड सत्र सुरू ठेवून गुटखा माफियांना सळो की पळो करून सोडले असून परत स्थानिक कंगारपुरा येथे अब्दुल आकिल अब्दुल इस्माईल ह्याला पकडून त्याचे कडून 8000 रुपयांचा गुटखा जप्त केला, सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली अकोट शहर चे गुन्हे शोध पथकाचे जितेंद्र कातखेडे, राहुल वाघ, संतोष गावंडे, मंगेश खेडकर, नासिर शेख ह्यांनी पार पडली मागील 15 दिवसात 5 रेड करून अकोट शहर पोलिसांनी लाखोंचा गुटखा पकडला असून गुटखा माफिया सावध झाल्याचे चित्र दिसून येत आहे, अवैध गुटखा वाहतुकी विरोधात कारवाई सतत सुरूच राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले।