अमरावती- आपण 72 वा स्वतंत्र्य दिन साजरा करत आहोत. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे भारतात आजही अशी एक रल्वे लाईन आहे, जिच्यावर ब्रिटनचा ताबा आहे. या रेल्वेचा मालकी हक्क आपल्याकडे नाही. ब्रिटनची एक कंपनी या रेल्वेची संचालक आहे. नॅरो गेज (छोटा ट्रॅक) ही रेल्वे लाइन वापर करणारी भारतीय रेल्वे दरवर्षी एक कोटी 20 लाखांची रॉयल्टी ब्रिटनच्या एका प्रायव्हेट कंपनीला देते.
या ट्रॅकवर केवळ एकच ट्रेन
– या रेल्वे ट्रॅकवर शकुंतला एक्सप्रेस नावाची एक पॅसेंजर गाडी चालते. अमरावती ते मुर्तजापूरदरम्यान 189 किमी प्रवास ही ट्रेन सहा ते सात तासात पूर्ण करते.
– या प्रवासात शकुंतला एक्सप्रेस अचलपुर, यवतमाळसह 17 छोटे-मोठे स्टेशनवर थांबा घेते.
– 100 वर्ष जुने असलेल्या 5 डब्यांच्या या ट्रेनला 70 वर्षांपर्यंत स्टीम इंजन होते. ते 1921 मध्ये ब्रिटनच्या मॅन्चेस्टर मध्ये बनवण्यात आले होते.
– 15 एप्रिल 1994 ला शकुंतला एक्सप्रेसचे स्टीम इंजिन काढून डीजल इंजिन बसवण्यात आले.
– या रल्वे रुळावर लावलेले सिग्नल आजही ब्रिटिशकालीन आहेत. त्यांची निर्मिती इंग्लंण्डच्या लिवरपूलमध्ये 1895 मध्ये करण्यात आली होती.
– सात कोच असलेल्या या पॅसेन्जर ट्रेनमध्ये एक एजारहून अधिक लोक प्रवास करतात.