तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथे उपविभागीय कार्यालय आहे मात्र ते नावालाच आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.कारण सुविधा पुरवण्यात ढिम्म तसेच भोंगळ असा कारभार नेहमीच येथील कार्यालयाचा पहावयास मिळतो.आज असाच काहीसा प्रकार घडला असून महावितरणने ग्राहकांना एक जबर शॉक दिला आहे.तो शॉक म्हणजे आठवडी बाजारामधील महावितरणच्या रोहित्राचा दाब अचानक वाढल्याने जवळपास ३५ ते ४० ग्राहकांच्या घरातील उपकरण जळाले असून १० ते १५ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
यामध्ये शहरातील सराफ लाईन,लोकमान्य टिळक चौक,जामा मशिद या भागातील ग्राहकांना याचा फटका बसला असुन ग्राहकांना मात्र दुष्काळात तेरावा महिना आला आहे.कारण आधीच पीक पाणी नाही कामधंदे नाहीत आर्थिक उणीव जाणवत असतांना आज महावितरणच्या भोंगळ कारभाराने ग्राहकांचे लाखोंचे नुकसान केले आहे.यामध्ये ग्राहक हे ग्राहक मंचात धाव घेणार आहेत.
हेही वाचा : युवासेनेच्या वतीन 15ऑगस्टला तेल्हारा येथे भव्य तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन