अकोट ( सारंग कराळे) – अकोट येथील कांलका चौक ते अकोला नाका हा रस्ता मजुंर झाल्यानतंर नगर पालीकेद्वारे या रस्ताचे काम सुरु करण्यात आले नाही त्यामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे वाहनचालकाचा तर सोडाच पादचार्याना सुद्धा या रस्तावरुन चालणे मुश्कील झाले आहे सदर रस्ता त्वरीत करण्यात यावा या मागणीसाठी जेष्ठ नागरीक महादेव सातपुते यांनी काही दिवसापुर्वी आमरण उपोषण केले होते . त्यावेळी त्यांना सदर रस्त्याचे काम त्वरीत सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले परंतु आज पर्यतही सदर काम सुरु करण्यात आले नाही झोपेचे सोग घेतलेल्या पालीका प्रशासनाला जागे करण्यासाठी आता महादेव सातपुते यांनी येत्या 14ऑगस्ट रोजी अकोल्या नाक्यावर वर मुडंण आंदोलन करण्याचे निर्णय घेतला आहे या संदर्भात मुख्यधिकार्यासह सर्व सबंधीताना निवेदन देण्यात आली आहेत गेल्या काही वर्षापुर्वी सदर रस्त्याची निवीदा काढण्यात आल्यानतंर ठेकेदाराला कञांटसुद्धा
देण्यात आले होते परंतु त्यानतंर नोट बदी जीएसटीचे कारण पुढे करुन कामात उशीर झाला यासाठी निधी सुद्धा उप्लबध आहे नगराध्यक्ष ते मंञालयापर्यत याबाबीचा पाठपुरवा सातपुते यांनी केला असुन या रस्त्याचे भिजंते घोघडे बाकीच आहे._________________
* *महादेव सातपुते यांनी यापुर्वी या रस्त्याच्या कामासाठी पालंकमञी याच्या जनता दरबारात पालंकमञ्यांना पुष्पगुष्छ देऊन गांधीगिरी केली होती व नगर पालीकेसमोर 5 दिवस ऊपोषण केले होते त्यानतंर ञस्त नागरीकांनी डबक्यात बसुन आदोंलन केले होते आता 14ऑगस्ट ला प्रशासनाच्या विरोधात मुडंण आंदोलन करणार आहेत **