तेल्हारा(सुनीलकुमार धुरडे)- पाणी फाऊंडेशन ने राबविलेल्या 45 दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्रा सह आपल्या तेल्हारा तालुक्यातील गावानी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला गावातील सर्व समविचारी लोकांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर पाणलोटाची कामे केली . त्याची च पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवर आज मोठ्या दिमाखात पुरस्कार वितरण सोहळा चालु आहे . यामध्ये आपल्या तेल्हारा तालुक्यातील 3 गावानी क्रमांक पटकावत तेल्हारा तालुक्याचे नावात आणखी विशेष भर घातली आहे . या स्पर्धेत सातपुडया च्या कुशीत वसलेल्या आदिवासीबहुल गावात बाहेरील शासकीय लोकांनी येऊन केल्याच्या कामाची आज दखल घेण्यात आली .यामध्ये तेल्हारा तालुक्यातून *करी रूपागड* या आदिवासीबहुल गावाने प्रथम क्रमांक पटकाविला असुन व्दितीय क्रमांक आदिवासीबहुल वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या *बोरव्हा* या गावाने पटकाविला तर तृतीय क्रमांक *द्वितीय बोरव्हा
तिसरे *मनब्दा* या गावाने पटकाविला आहे.