तेल्हारा(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाकडून अपंग विद्यार्थाना भत्ता दिल्या जातो मात्र तो भत्ता जर विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या निष्काळजी पणामुळे दिला जात नसणार तर शिक्षण अधिकारी यांनी कारवाई करणे भाग असते मात्र याबाबत उदासीनता दाखवत थेट विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत पाउल उचलून भत्याची मागणी करावी लागते ही शिक्षण विभागाला लाजिरवाणी बाब आहे.
तेल्हारा शहरातील साई नगर स्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे जेमतेम दहा च्या आत येथे विद्यार्थी संख्या आहे.दोन शिक्षक एवढे कमी विद्यार्थी असून सुद्धा येथील शिक्षक किती आपल्या शिक्षक पेशे विषयी गंभीर आहेत हे या शाळेमध्ये झालेल्या प्रकारावरून लक्षात येते.या शाळेमध्ये प्रथमेश रवींद्र विरघट हा अपंग विद्यार्थी इयत्ता ४ मध्ये शिकतो अपंग असल्याने शासनाकडून त्याला भत्ता स्वरूपात २५०० रुपये मिळतात.सण २०१६-१७ मध्ये सदर विद्यार्थ्यांचा भत्ता दि २८ मार्च १८ रोजी शाळेच्या बँक खात्यात जमा झाला होता.मात्र त्यावेळेसच्या मुख्याध्यापक असलेल्या देशमुख मॅडम यांनी हेतूसपरस्पर सदर विद्यार्थ्याला दिले नाही.याबाबत पालकाने लेखी तक्रार देऊन आरोप केला आहे की सदर पैशांचा गैरवापर केला आहे.वारंवार पालकाने विचारणा केली असता तुमचा भत्ता जमा झाला नाही असे उत्तरे आज पर्यंत मिळत होती.याबाबत स्वतः विद्यार्थ्यांच्या पालकाने चौकशी केली असता गेल्या सहा महिन्यांपूर्वी च पैसे जमा झाल्याचे कळाले. सहा महिन्यांचा कालावधी उलटून सुद्धा सदर अपंग विद्यार्थ्याला भत्ता देण्यात न आल्याने पालकाने गट विकास अधिकारी यांच्या कडे तक्रार दिली असून शासकीय कामात दिरंगाई केल्याच्या व फसवणूक केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.नेमकी याबाबत शिक्षण विभागावाकडून कुठली पाऊले उचलल्या जाणार याकडे लक्ष लागले आहे.