अकोला : जिल्हा परिषदमधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच इतर राजपत्रीत अधिकारी यांची पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होत असून पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण दिनामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वात जास्त तक्रारी येत आहेत. याची दखल घेवून पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची मुंबई येथे दिनांक 7 ऑगस्ट रोजी भेट घेवून अकोला जिल्हा परिषदेतील विविध प्रश्न व अडीअडचणीबाबत चर्चा केली.
यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा परिषदमधील अधिका-यांच्या रिक्त पदावर तात्काळ अधिकारी उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधीतांना निर्देश दिले.
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या जनता तक्रार निवारण दिनामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 2015-16, 2016-17 व 2017-18 या कालावधीत निर्माण झालेल्या विविध रस्त्यांपैकी काही रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेवून पालकमंत्री यांनी या रस्त्यांना भेट देवून पाहणी केली. रस्ता खरोखरच निकृष्ट दर्जाचा असल्याचे त्यांना आढळून आले. याबाबत ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याशी चर्चा केली. सदर कामांची चौकशी त्रयस्त यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री यांनी दिली व संबंधीतांना याबाबत सूचना दिल्या.
जिल्हा परिषदमध्ये मागील काही वर्षापासून शिक्षकांच्या पदोन्नत्या झाल्या नसल्याचे विविध शिक्षक संघटनेने केलेल्या तक्रारीमुळे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या निदर्शनात आले आहे. शिक्षकांचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याशी चर्चा केली. जिल्हा परिषद मधील शिक्षकांच्या पदोन्नत्या तात्काळ करण्यात येतील, अशी ग्वाही पंकजाताई मुंडे यांनी दिली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola