०९ ऑगस्ट १८ : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात सकल मराठा समाजाच्या राज्यव्यापी बंदला तेल्हारा तालुक्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज गुरुवारी सकाळी सकल मराठा आंदोलनास मनबदा, दापुरा, निंबोळी, खापरखेड सुरुवात झाली. त्यात मराठात्तर लोकांनीही सहभाग नोंदवला.
सकाळी ९वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन.व माल्यार्पण चिमुकल्यांचे हस्ते करण्यात आले.तसेच राष्ट्रगीताने व जय भवानी जय शिवाजी,एक मराठा लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा देवून आंदोलन सुरु झाले आदोलकानी अकोट शेगाव मार्गावर दापुरा फाटा येथे रोडवर पाईप टाकून चक्का जाम आंदोलन करण्यात आले यामुळे तालुक्यातील सर्व मार्गावर वाहने थंबवले होते.
मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहीजे, अस कस देत नाहीं घेतल्या शिवाय राहत नाही,एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी.. अशा गगनभेदी घोषणांनी तेल्हारा अक्षरशः दणाणले.
अधिक वाचा : १३ ऑगस्ट पासुन अकोला जिल्हातील संगणक परिलकांचे आमरण उपोषन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola