माझ्यात दोष होते जाळीत मी निघालो
माझ्यातल्या गुणांना शोधीत मी निघालो
आधार जे जगाचे त्यांचेच वार दिसले
माझ्याच माणसांना टाळीत मी निघालो
बदलून रीत माझी आता कठोर झालो
त्यांचेच तीर त्यांना मारीत मी निघालो
प्रत्येक शब्द माझा वादात आज दिसला
आभार त्या जगाचे मानीत मी निघालो
माझ्या मनात होता आकांत दाटलेला
दुःखात आसवांना गाळीत मी निघालो
भरल्या जगात माझे उरले कुणीच नाही
समजून मग स्वतःला शापीत मी निघालो
झेलून वार त्यांचे थकलोय मी कधीचा
मुक्काम शेवटीचा गाठीत मी निघालो
अनिल रेड्डी खलंग्री
ता रेनापूर जि लातूर