अकोला: ( निलेश अढाऊ) अकोला जिल्हातील ग्रामपंचायत संगणक परीचालकांचे माहे डिसेंबर २०१७ ते माहे जुन २०१८ पर्यत मानधन झालेले नाहीत. काही संगणक परीचालकाचे मानधन हे अर्धवट स्थितीत झाले आहेत.
ग्रामपंचायत ने संगणक परिचालकांचा मानधन निधि वर्ग करून जिल्हा परीषदला दिला जिल्हा परीषदने मे २०१८ ला कंपनीला दिले आहेत तरी सुध्दा कंपनीने अद्याप पर्यत केंद्रचालकांना मानधन दिले नाही. त्यामुळे संगणक परीचालकावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संगणक परीचालकानी १३ऑगस्ट २०१८ पासुन आमरण उपोषन करणार असल्याचे निवेदन मुख्यकार्यकारी अधीकारी, जि.प अकोला यांना दिले आहे.
संगणक परिचालक संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे व राज्यसचिव मयुर कांबळे यांच्या मार्गदर्शनाने सदर आमरण उपोषनाचे नियोजन केले आहे. दिलेल्या निवेदनावर संगणक परिचालक संघटना,अकोला जिल्हाध्यक्ष अविनाश मातळे,जिल्हा उपाध्यक्ष अतुल अंबुलकर, जिल्हा सचिव शिवा गावंडे, तालुका अध्यक्ष – मुकेश बिहाडे, तेल्हारा, सचिन गिते, अकोट, पुनम शर्मा, बाळापुर, रंजित सिरसाट, अकोला, शरद कळंब, मुर्जिजापूर, महेश गावंडे, पातुर, पवन फाळके, बार्शिटाकळी तथा सदस्य राहुल देशमुख, मिलींद इंगळे, प्रितेश गवई, विवेक गावंडे यांच्या सह्या आहेत.
संगणक परिचालक संघटनेच्या मागण्या
1) थकीत मानधन मिळणे बाबत
2) अकोला तालुका व्यवस्थापकावर कारवाई करणे
3) जिल्हा परीषद व पंचायत समिती ऑपरेटरना नियुक्ती देणे
4) आपले सरकार सेवा केंद्र वाढविणे
5) नादुरूस्त संगणकाचे स्पेअपार्ट मिळणे.
अधिक वाचा : अकोला अर्बन कर्ज घोटाळा; हायकोर्टाचा दणका; FIR रद्दची याचिका दाखल करण्यासाठी मुदत