अकोला(प्रतिनिधी)-गेल्या आठवड्यात बाळापूरच्या भूमिलेख विभागातील कारवाईची घटना ताजी असतानाच आज पुन्हा पातूर पंचायत समिती मध्ये अकोला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून पंचायत समितीच्या चपराशाला रंगेहाथ लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली आहे.१.वामन सीताराम गाडगे,वय ५७ वर्षे,पद- चपराशी वर्ग -४,पंचायत समिती पातूर,जि. अकोला व २.सागर चंदन , वय 32 वर्षे,पद- तांत्रिक सहाय्यक अधिकारी,वर्ग – ३,पंचायत समिती,पातूर,जि. अकोला अशी आरोपींची नवे आहेत.
यातील अटक करण्यात आलेल्या आरोपींने तक्रारकर्त्यास महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरीच्या बांधकामाचे बिल मंजूर करून मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे करीता तक्रारकर्त्यास ३००० रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारकर्त्याने दि. २/८/२०१८ रोजी ३००० रुपये लाचेची मागणी करण्यात आल्याबद्दल दिलेल्या तक्रारीवर दि. ६/८/२०१८ रोजी पडताळणी करून आज दि.७/८/२०१८ रोजी सापळा कारवाई केली यात ३०००रुपये लाचेची रक्कम स्वीकारत असताना पातूर पंचायत समितीचे चपराशी वामन सीताराम गाडगे यांस रंगेहाथ पकडण्यात आले असून लाचेची रक्कम ३००० रुपये पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.
सदरहू कारवाई संजय गोर्ले, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला, पोना.सुनील राऊत,पोशि. संतोष दहिहंडे, राहुल इंगळे, सुनील येलोने,चालक कैलास खडसे, यांनी केली आहे. यातील आरोपी वामन गाडगे यास ताब्यात घेण्यात आले असून दुसऱ्याचा शोध सुरू असून पुढील कारवाई चालू आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola