अकोला: सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांचा संप पुकारला आहे; परंतु गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रहार आश्रम शाळा संघटनेने या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रहार प्राथ, माध्य, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष महेश डवरे यांनी ही माहिती दिली असून, सर्वांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
आश्रम शाळा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष महेश डवरे यांनी आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांना संपात न सहभागी होण्याच्या सुचना केल्या आहेत. शिक्षक हा देश घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो आणि देशाचा कणा असलेला जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांची मुले मोठ्या संख्येने आश्रमशाळांतच शिक्षण घेत आहेत. तथापि, सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ही बाब लक्षात घेत समाजाचे ऋण म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या प्रहार आश्रम शाळा संघटनेच्या आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला आहे आणि सातवा वेतन आयोगही त्यांचा अधिकार असून, तो लवकरच लागू करण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे. त्यामुळे या संपाची आवश्यकता आम्हाला वाटत नसल्याचे आश्रम शाळा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील तमाम आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांनाही त्यांनी संपात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. तथापि, इतर संघटनांच्या संपाला त्यांनी अंशत: पाठिंबा जाहीर केला आहे.
इतर संघटनांच्या बंदला आपल्या हक्का करीता आम्ही अंशत: पाठींबा जाहीर करतो; परंतु शेतकरी मायबापाच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसाण टाळण्याकरीता शाळा बंद न ठेवण्याचे आम्ही ठरविले असून, महाराष्ट्रातील तमाम आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांना सहकार्याचे आवाहन करीत आहोत.-महेश विष्णुपंत डवरे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola