अकोट(सारंग कराळे)- गेली काही दिवसांपासून अकोट शहराततील घरगुती नळातुन लाल किडे आढळून येत आहेत, त्यामुळे अकोट शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तरी या गंभीर समस्येबद्दल आज दिनांक ७ ऑगस्ट २०१८ ला दुपारी २.३० वा.अकोट जीवन प्राधिकरण विभागाच्या उपविभागीय अधिकारी यांना शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते,
संपर्क प्रमुख खा.अरविंद सावंत,आ.गोपिकीशन बाजोरिया,सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर,जिल्हाप्रमुख नितीन बाप्पू देशमुख,
मा.आ.संजय गावंडे,अकोट विधानसभा संपर्कप्रमुख भास्करजी ठाकूर,महिला आघाडी संपर्क संघटिका सौ.मधुराताई देसाई,महिला जिल्हा संघटिका प्रा.सौ.मायाताई म्हैसने मॅडम यांच्या मार्गदर्शनात शेकडो शिवसैनिक व महिला आघाडीच्या सदस्यांसोबत न.पा.पाणीपुरवठा सभापती तथा शिवसेना गटनेता मनिष रामाभाऊ कराळे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.यावेळी मनिष कराळे यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांना याप्रकरणी तसेच अकोट शहरातील इतर पाणी पुरवठा समस्यांबाबत जाब विचारत चर्चा केली.यावेळी चर्चेत मुख्य समस्या अकोट शहरात घरगुती नळातुन पाण्यात लाल अळ्या आढळून आल्या त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.यामधून जर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा आरोग्यास धोका निर्माण झाला व त्यातून जर जीवित हानी झाली तर संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला लावू व अळ्या असलेले दूषित पाणी पाजू असा इशारा यावेळी दिला.याप्रसंगी प्रमुख उपस्थिती महिला जिल्हा संघटिका प्रा.सौ.मायाताई म्हैसने,उषाताई गिरनाळे,विजय ढेपे,बजरंग गोतमारे,श्रीकांत कांबे,सुभाष सुरत्ने,धनराज गावंडे,ज्ञानेश्वर मानकर,विशाल चौधरी,विजय भारसारळे यांची लाभली.तसेच यावेळी अक्षय घायल,संतोष मोहोकार,अरविंद मर्दाने,सौ.नर्मदा कहार,सौ.माया मोहिते,सौ.मिनाताई हेढावु,सौ.रमा प्रांजळे,सौ.छाया कहार,मयुरी कहार,सौ.सरला गौर,सौ.जया देशमुख,सौ.शिल्पा ढोले,संतोष तायडे,मयुर भगत,
सागर उगले,पवन सावरकर,
पंकज धांडे,शुभम परियाल,नारायण पोटे,गोपाल अस्वार,शिवम दामधर,अंकुश राठौड,कैलास दामधर,धिरज खिरोडकार,प्रविण वसु,शुभम ठाकुर,वैभव वनकर,दादा वानखडे,विशाल कोडापे,नयन करवते,विजय कोडापे,पंकज पालेकर,सुचक भांबुरकर,नरेश सभागचंदाणी,निलेश ठाकरे, यांच्यासह शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी तथा शिवसैनिक व महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या.याप्रसंगी सभापती मनिष कराळे यांनी या समस्येचे निवारण होईपर्यंत अकोट शहरातील नागरिकांनी पाणी पाहुन वापरा,गाळून वापरा तसेच उकळून थंड करून पिण्यासाठी वापरा अशी विशेष काळजी घेत आपले व आपल्या परिवाराचे आरोग्य सुरक्षित करा असे जाहीर आवाहन केले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola