अकोट(सारंग कराळे)-अकोला शहरानंतर अकोट शहरात कावड उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, अकोट शहरातील 22 कावड मंडळ सदर उत्सवात सहभागी होतात, ह्या वर्षी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी दिनांक 3।9।18 रोजी अकोट शहरात कावड उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहेत, शिवभक्त रविवारी रात्रीच गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पाणी आणून सोमवारी सकाळीच वाजत गाजत शहरातून कावड मिरवणूक काढून तपेश्वर मंदिरातील शिवलिंगा ला कावड मधील पाण्याने अभिषेक करतात सदर उत्सवात 7 ते 8 हजार लोक सहभागी होतात.
अकोट शहराच्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघते, व जागोजागी कावडीची पूजा होते व शिवभक्तांना प्रसादाचे वाटप होतें ,ह्या दरम्यान कायदा व सुवयवस्था कायम राहावी म्हणून कावड मंडळाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांची मीटिंग अकोट शहर चे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सावली सभागृहात बोलाविली होती सदर सभेला नगर पालिका अध्यक्ष हरिणारायन माकोडे, कावड मंडळाचे अध्यक्ष संजय गोरे, दिगंबर सोळंके, अनंता मिसाळ व जबाबदार पदाधिकारी हजर होते, सदर मीटिंग मध्ये कावड उत्सव शांततेत साजरा होण्या साठी आवश्यक बाबीवर चर्चा झाली.
अधिक वाचा : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी घेतला ग्राम सडक योजनेचा आढावा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola