अकोला : नॅशनल हायवे क्रमांक 6 ते कळंब , कसुरा , डोंगरगाव , लोहारा तालुका बाळापूर या सुमारे 8 किलोमीटर अंतराच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये तयार करण्यात आलेल्या रस्त्यांबाबत या भागातील नागरीकांनी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे तक्रार केली त्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्री यांनी जनता तक्रार निवारण दिनाच्या अगोदर जिल्हाधिकारी यांच्या दालनात संबंधीत विभागाची आढावा बैठक घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, बाळापुरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे तसेच संबंधीत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उप अभियंता नितीन नाखड, पारस विदयूत औष्णिक केंदा्रचे मुख्य अभियंता श्री गोहणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पारस विदयूत औष्णिक केद्रांच्या अवजड वाहतुकीमुळे सदर रस्ता खराब झाला असल्याचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उप अभियंता नितीन नाखड यांनी पालकमंत्री यांच्या निदर्शनात आणून दिले. त्यावर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या सुचनेनुसार सदर रस्ता दुरूस्तीचे कामासाठी पारस विदयूत औष्णिक केंद्राकडून निधी देण्यात येणार असल्याचे पारस विदयूत औष्णिक केंदा्रचे मुख्य अभियंता श्री गोहणे यांनी सांगितले. सदर रत्यांचे काम त्वरीत करण्याबाबतच्या सुचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधीत विभागाला दिल्यात.
अधिक वाचा : अकोला जिल्हा विदयूत वितरण नियंत्रण समितीची बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola