अकोला – रुग्णांना वैद्यकीय सेवा उत्तम व दर्जेदार मिळण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शासकीय वैदयकीय महाविदयालय व सर्वोपचार रूग्णालयाला भेट देवून रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, वैदयकीय अधिक्षक डॉ. शिसाम, वैदयकीय उप अधिक्षक डॉ. नैताम , प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, चंद्रकांत चन्ने आदी उपस्थित होते.
डॉ. रणजीत पाटील स्वत: वैदयकीय व्यवसायामध्ये असल्यामुळे त्यांना रूग्णांबदृदल आस्था आहे. यामुळे ते वेळोवेळी वैदयकीय महाविदयालयाला व सर्वोपचार रूग्णालयाला भेट देवून रूग्णांना चांगली व योग्य सेवा मिळण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. यासाठी वैदयकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता तसेच वैदयकीय अधिकारी यांच्याशी ते नेहमी चर्चा करत असतात.
दि. 6 ऑगष्ट रोजी पालकमंत्री यांनी नेत्र चिकित्सा विभाग , बालरोग चिकितसा विभाग , चर्मरोग, गुप्तरोग, कुष्ठरोग विभाग , दंतरोग चिकीत्सा , बाहयरूग्ण विभाग, मुखपुर्व कर्करोग उपचार केंद्र , कान, नाक,घसा विभाग आदी विभागाला भेट दिली. तेथे उपचारासाठी आलेल्या रूग्णांना विचारपूस करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .
डॉ. रणजीत पाटील यांनी बालरोग चिकीत्सा वार्डाला भेट दिली. तिथे उपचारासाठी असलेल्या लहान मुलांना योग्य उपचार व औषधी देण्याबाबत तिथे उपस्थित असलेल्या नर्सिंग स्टाफला सुचना दिल्यात. रूग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्यात. यानंतर बांधकाम चालू असलेल्या श्रोतृगृह (ऑडीटोरियम) भेट देवून त्वरीत बांधकाम पुर्ण करण्याबाबत सुचना दिल्यात.
तत्पुर्वी डॉ. रणजीत पाटील यांनी अधिष्ठाता यांच्या कक्षात शासकीय वैदयकीय महाविदयालयाच्या प्रशासकीय तसेच रूग्णांच्या आरोग्य सेवेबाबत आढावा घेतला. पोस्टमार्टन मधील कोल्ड स्टोरेज, रूग्णालयात निर्माण होणारे बॉयो केमिकल वेस्ट आदि बाबत माहिती घेतली. विदयार्थ्यांना शिकविण्यासाठी असलेल्या एक्सपर्ट फॅकल्टी बाबतची माहिती घेतली. पॅथालॉजी , रुग्णालयातील आंतर रुग्ण विभाग, बाह्य रुग्ण विभाग, विविध शस्त्रक्रिया, रक्तपेढी, अतिदक्षता विभाग, एमआरआय, औषधांचा साठा, रुग्णवाहिका आदींची सुक्ष्म माहिती घेऊन आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी वैद्यकीय सेवेत सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
विविध अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही डॉ.पाटील यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येणा-या विदयूत विभागातर्फे शासकीय वैदयकीय महाविदयालतील विदयूत विषयक कामांत दिरंगाई होत असल्याची तक्रार अधिष्ठाता राजेश कार्यकर्ते यांनी केली. यावेळी पालकमंत्री यांनी त्वरीत दुरध्वनीवरून संबंधीत विभागाच्या अधिका-यांशी संपर्क करून कामात कुचराई न करण्याबाबत त्यांची कानउघाडणी केली.
अधिक वाचा : अकोला जिल्हा विदयूत वितरण नियंत्रण समितीची बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola