अकोला : जिल्हातंर्गत असलेल्या विदयूत वितरण प्रणालीमध्ये असलेल्या जनतेच्या अडीअडचणी व तक्रारींचे त्वरीत निवारण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेत. आज दि. 6 ऑगष्ट 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात अकोला जिल्हा विदयूत वितरण नियंत्रण समितीची बैठक पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महावितरणचे अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट, इंफ्राचे अधिक्षक अभियंता राहुल बोरीकर, अकोला शहराचे कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी, ग्रामीणचे गजेंद्र गाडेकर, अकोट विभागाचे प्रमोद काकडे, प्रशासनाचे अजय खोब्रागडे व अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हयात इंफ्रा 1 , इंफ्रा 2 तसेच दिनदयाल उपध्याय ग्राम ज्योती योजना , एकात्मिक ग्राम विकास योजना तसेच कृषिपंप उर्जीकरण कार्यक्रमातंर्गत भरीव निधी प्राप्त झालेला आहे. जिल्हयातील विदयूत ग्राहकांना व शेतक-यांना आवश्यक दाबाचा विदयुत पुरवठा करण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.
सर्वसामान्य जनतेच्या विदयूत देयकाबाबत असंख्य तक्रारी जनता तक्रार निवारण सभेत प्राप्त होत असतात. असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, विदयूत बिल वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात यावी अशा सुचना त्यांनी दिल्यात. .
इंफ्रा 1 व इंफ्रा 2 या योजनेतंर्गत 12 नवीन उपकेंद्रे व 6 अतिरीक्त उपकेंद्र रोहित्र बसविण्याचे काम प्रस्तावित होते त्यापैकी बैलखेड, सौंदळा, येदलापूर ,चान्नी, हातरूण , कानशिवनी, कौलखेड, अकोट, व मोहाळा या उपकेंद्राची कामे पुर्ण झाले असून जलालाबाद या उपकेंद्रांचे काम या महिन्यात पुर्ण होणार आहे. उर्वरीत उपकेंद्रांचे काम प्रगती पथावर असल्याची माहिती महावितरणचे अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिली.
अकोला येथे पाणिपुरवठा करणा-या महान येथील पाणी पुरवठा योजनेला अखंड विदयूत पुरवठा होत नसल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करणे अशक्य होत आहे. त्यामुळे सदर समस्या कायस्वरूपी निकाली काढण्याकरीता अतिभारीत असलेल्या 33 केव्ही वाहनीला 33/ 11 केव्ही पिंजर व महान येथील उपकेंद्राचा भार नविन 132 केव्ही कंझरा उपकेंद्रावर प्रस्तावित करण्यात येत असून हे काम सध्या प्रगती पथावर आहे.
जिल्हयात 5 हजार 721 कृषिपंपाचे विदयूत जोडणी प्रलंबीत असून सर्व मार्च 2018 पर्यंत पैसे भरून प्रलंबीत असलेल्या सर्व कृषि अर्जदारांना उच्चदाब प्रणालीव्दारे मार्च 2020 पर्यंत वीज जोडण्या देण्याचे प्रस्तावित असल्याचे माहिती श्री. कछोट यांनी दिली.
नियमीत विज बिल न मिळणेबाबत व रिंडीग व्यवस्थीत होत नसल्याच्या तक्रारीसाठी महावितरणे सेंट्रलाईज बिलींग सिस्टीम सेवा सुरू केली असल्याचे सांगुन यापुढे बिल न मिळण्याचे प्रमाण कमी होणार असल्याची माहिती श्री कछोट यांनी दिली.
या बैठकीला विदयूत विभागाचे सर्व उपविभागीय अधिकारी , शहरी व ग्रामीण विभागाचे सेंक्शन इंजिनीअरसह महावितरणाचे अधिकारी उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola