दानापूर (सुनिलकुमार धुरडे.)- महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक हक्क संघटना अंतर्गत जिल्ह्यातील तालुका स्तरीय कार्यकारिणी स्थापन करण्यात आल्या असुन जिल्हा व तालुक्यातील सुरक्षारक्षक कामगारांना न्याय/ हक्क मिळवून देण्यासाठी सदर कार्यकारिणी स्थापन करण्यात आली . यावेळी झालेल्या बैठकीत तालुका अध्यक्ष पदी प्रफुल्ल हरणे तर उपाध्यक्षपदी अनिल बावस्कर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . यामध्ये तालुका कार्यकार्याध्यक्ष पदी सुरेश राहाणे ,धम्माल वाकोडे ,सचिन काळे,बाळकृष्ण तळोकार, भिमराव तायडे , प्रविण राऊत , संजय भगत आदींची नियुक्ती करण्यात आली . यावेळी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक रक्षक सरचिटणीस रविंद्र भले , उपाध्यक्ष अमित देशे ,प्रविण वंजारी, कपिल गजघाणे,दिलीप कानतोडे, प्रितम पहुरकार, राजेश मानकर ,विलास सपकाळ ,पंकज सावळे,प्रविण किरदक, राहूल वानखडे,निलेश वलगावकर ,सचिन पंचबुद्धे याच्या उपस्थित नियुक्ती पञे देण्यात आली .