तेल्हारा : आज दि ०४ ऑगस्ट रोजी दुपारी अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकडे हे तेल्हारा येथे आले असता त्यांना तेल्हारा तालुक्यातील समस्त सकल मराठा समाज बांधवानी घेराव घालून त्यांना आरक्षणाबाबत विचारणा केली असता त्यांना योग्य उत्तरे न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेत असल्याचे लक्षात येताच तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून आमदार प्रकाश भारसाकडे यांनी पोलीस बंदोबस्तात रवाना केले. यावेळी शहरासह तालुक्यातील असंख्य मराठा समाजातील कार्यकर्ते हजर होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने काढलेल्या मोर्चाला शासनाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सकल मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे.तर वेगवेगळ्या मार्गाने सरकारला व लोकप्रतिनिधींना धारेवर धरून आक्रमक होतांना दिसून येत आहेत.
अधिक वाचा – अकोल्यातील प्रसिद्ध मुकीम अहमद व त्याच्या सहकार्याचा मृतदेह बुलढाणा जिल्यातील जानेफळ येथे सापडला,घातपाताची शक्यता
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola