तेल्हारा (प्रतिनिधी) -तेल्हारा शहरातील तालुका क्रीडा संकुलचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले होते या बाबत युवा सेनेने हा प्रश्न लावून धरत आ .गोपिकिसन बाजोरीया यांना निवेदन देऊन मांगणी करताच 3 ऑगस्टला जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा अधिकारी यांना बोलावून क्रीडा संकुलचे काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले तेल्हारा क्रीडासंकुल च्या दुरावस्थेत असल्याबाबत युवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.
हा प्रश्न मार्गी लावण्या करिता या संदर्भात दि .03/08/2018 रोजी मा. आमदार गोपिकीशन बाजोरिया यांच्या कार्यालयामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी व ,तालुका क्रीडा अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून क्रीडा संकुलचा प्रश्न विनाविलंब सोडविण्या बाबत अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
सदर धावपट्टीची काम आठदीवसाच्या आत ,सोडवू असे जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले या वेळी तेल्हारा पालिकेचे माजी अध्यक्ष सुनील पालिवाल माजी नगरसेवक रामभाऊ फाटकर ,माजी शिवसेना शहर प्रमुख राजेश वानखडे, हेमंत अवचार , युवा सेना शहर प्रमुख सचिन थाटे, पप्पू कामटे, यांच्या उपस्थितीत क्रीडा संकुलाच्या विकासा बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी युवासेना शहर प्रमुख सचिन थाटे यांनी क्रीडा संकुल च्या समस्या बाबत मा.आ.गोपिकीशनजी बाजोरिया यांना संपूर्ण माहिती दिली व आ.बाजोरिया यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कडून क्रीडासंकुलच्या कामाबाबत आढावा घेऊन युवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची त्वरित दखल घेऊन काम सुरू करावे व 15 ऑगस्ट पर्यंत प्राधान्याने रनिंग ट्रक दूरस्थ करुन सर्व सोयी सुविधा युक्त तयार करून उपलब्ध करून द्यावे असे निर्देश जिल्हा क्रीडा अधिकारी यांना देण्यात आले.
अधिक वाचा : अकोला : 7 लाख कापडी पिशव्या खरेदी करण्याचा विविध संस्थांचा निर्धार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola