• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाराष्ट्रात विरोधी व नाराजीच्या वातावरणातही भाजपला स्पष्ट बहुमतासह घवघवीत यश

Editor by Editor
May 20, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
महाराष्ट्रात विरोधी व नाराजीच्या वातावरणातही भाजपला स्पष्ट बहुमतासह घवघवीत यश
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई :  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या सकल मराठा मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या विरोधात वातावरण असतानाही सांगली, मिरज, कुपवाड आणि जळगाव मध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्याचे चित्र आहे. सांगली, मिरज, कुपवाड मध्ये ४१ तर जळगाव मध्ये ५७ जागा मिळवित भाजपने  स्पष्ट बहुमत मिळविले आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सांगली, मिरज, कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणूकीत भाजपचा वारू रोखला जाईल असा होरा विरोधकांचा होता. मात्र या दोन्ही ठिकाणी पहिल्या दिवसापासूनच भाजपने विकासाचा मुद्दा केंद्रित करून प्रचारावर भर दिला होता. तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, मिरज, कुपवाड हा राष्ट्रवादी आणि कॅांग्रेसचा बालेकिल्ला असतानाही भाजपने या ठिकाणी आघाडीला खिंडार पाडत जोरदार मुसंडी मारली आहे.  ७८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवत भाजपने बहुमताचा आकडा पार करत दिग्गजांचे अंदाज धुळीस मिळविले आहेत.यापूर्वी केवळ २ जागा असलेल्या या महानगरपालिकेत ४१ जागा जिंकत भाजपने सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेवर झेंडा फडकावला आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

राजकीय तज्ज्ञांसह सांगलीतील दिग्गज नेत्यांचे अंदाज धुळीस मिळवित भाजपने सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत भाजपने सत्ता काबीज केली आहे. या महानगरपालिकेतील ७८ पैकी ४१ जागा जिंकत भाजपने बहुमत मिळविले आहे. या ठिकाणी कॅांग्रेसला २० तर राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या आहेत. सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनामुळे सांगलीत भाजपाचे पानिपत होईल अशी चर्चा होती मात्र ही अपेक्षा धुळीस मिळवित भाजपने सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेवर झेंडा फडकावला आहे. खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी विकास आघाडीला आणि अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला धक्कादायकरित्या पराभवाचा सामना करावा लागल्याने या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. या आश्चर्यकारक निकालानंतर शहरांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

या निवडणूकीत सांगली जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती.मराठा मोर्चाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचार सभांना उपस्थिती लावता आली नसल्याने स्थानिक नेत्यांवरच प्रचाराची संपूर्ण जबाबदारी होती. ही निवडणूक राष्ट्रवादी कॅांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे  आ. विश्वजित कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांची तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,सहकारमंत्री सुभाष देशमुख,खासदार संजय पाटील आ.सुधीर गाडगीळ, आ.सुरेश खाडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली गेली होती. आज मतमोजणीच्या सुरूवातीलाच आघाडीने भाजपला पिछाडीवर टाकल्याचे चित्र होते.मात्र आघाडीला नंतरच्या टप्प्यात भाजपने चारीमुंड्या चित केल्याचे चित्र पहायला मिळाले.  ७८ जागांसाठी एकूण ४५१ उमेदवार या निवडणूकीत आपले भविष्य अजमावित होते. त्यापैकी भाजपला ४१, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला ३५, स्वाभिमानी विकास आघाडीला १, तर अपक्ष १ जागा मिळाल्या आहेत. गेल्या महानगरपालिकेत भाजपला केवळ ६ जिंकत्या आल्या होत्या मात्र या निवडणूकीत भाजपने महानगरपालिकेचा गड जिंकत सहा थेट ४१ जागांपर्यंत मजल मारली आहे.

जळगावात सुरेश जैन यांना हादरा ; भाजपला बहुमत

जळगाव महानगरपालिकेत माजी मंत्री सुरेश जैन यांच्या ३५ वर्षाच्या सत्तेला भाजपाने सुरूंग लावला आहे.जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूकीत ५७ जागा जिंकत भाजपाने बहुमत मिळविले आहे.शिवसेनेला १३ जागा मिळाल्या आहेत तर आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. राज्यात सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणूकीत येथिल जनतेने विकासाला महत्व दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव महानगरपालिकेच्या एकूण ७५ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत एकूण ३०३ उमेदवार उभे होते. या निवडणूकीची मतमोजणी आज झाली.सुरूवाती पासून भाजपने आघाडी घेत ५७ जागा जिंकत या महानगरपालिकेत बहुमत प्राप्त केले आहे. शिवसेनेला १३ जागांवरच समाधान मानावे लागले तर एमआयएमला ३ तर अपक्षांनी २ जागा जिंकल्या आहेत.या निवडणूकीत माजी मंत्री सुरेश जैन यांच्या नेतृत्वाला गेल्या ३५ वर्षात मतदारांनी प्रथमच मोठा हादरा  दिला आहे.या ठिकाणी विकासाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विकासाचे आश्वासन दिले होते त्याला येथिल जनतेला कौल दिल्याचे सप्ष्ट होते.

अधिक वाचा : ग्राहकाकडून दुकानदाराने 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास दिला नकार, कोर्टाने सुनावली शिक्षा 

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

तेल्हारा येथील माजी आमदार बाळासाहेब तायडे यांचे बंधू जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विद्याधर तायडे यांचे निधन

Next Post

सकल मराठ्यांनी घातला आमदार प्रकाश भारसाकळे यांना घेराव

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
प्रकाश भारसाकळे

सकल मराठ्यांनी घातला आमदार प्रकाश भारसाकळे यांना घेराव

धोबी समाजासह इतर लहान समाजाला आरक्षण कधी देणार?  प्रतिनिधींचा प्रश्न

धोबी समाजासह इतर लहान समाजाला आरक्षण कधी देणार? प्रतिनिधींचा प्रश्न

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.