अकोला : शहरात नवीन योजनेच्या नावाखाली युवतींची व महिलांची फसवणूक करण्यात येत असून त्यांना आजीवन पेन्शन देण्यात येणार आहे असे सांगून त्यांना १० तथा २० रुपये देऊन अर्ज भरून दिले जात आहे. आता पर्यंत शहरात २० हजारांच्या वर अर्ज भरून घेण्यात आल्याची माहिती असून शासनाने या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांना अटक करावी अशी मागणी होत आहे.
शहरात व ग्रामीण भागात हि १८ ते ५९ वयोगटातील महिला व युवतींना आजीवन ४००० रुपये प्रतिमाह देण्याच्या नावाखाली अर्ज भरून दिले जात आहे. त्यासाठी काही जणांकडून १० तर काही जणांकडून २० रुपये घेतले जात आहे. आतापर्यंत १७ ते २० हजार अर्ज भरण्यात आले असून या माध्यमातून महिला व युवतींची आर्थिक लूट केली जात असल्याचं आरोप नागरिकांनी केला आहे. तर जिल्हा प्रशासनाने अशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काय आहे हे गौडबंगाल ?
काही सुज्ञ नागरिक सोशल मीडियावर अकोला शहरात काही लोकांकडून महिलांना १० रु प्रति प्रमाणे अर्जाची विक्री शहरातील अनेक भागात महिलांची आर्थिक लूट केली जात असल्याची पोस्ट टाकलेली आहे. याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रयत्न केले असता धक्कादायक माहिती समोर आली. शासनाची कोणतीही योजना नसताना या मागणीचे अर्ज काही लोक महिलांकडून भरून घेत असल्याची प्रकार शहरातील अनेक भागात सुरु असल्याची आढळून आले.
भरलेला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात आवक जावंक विभागात जमा केला असून अर्ज जमा करण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडत आहे.
शासनाची अशी कुठलीही योजना नाही- जिल्हाधिकारी
शासनाची अशी कुठलीही योजना व आदेश नसून या प्रकारचे अर्ज आवाक जावक विभागात येत आहेत मात्र कार्यालयात कुठल्याही प्रकारचे अर्ज स्वीकारण्यात येत असतात त्यामुळे ही बाब लक्षात येताच अशी कुठलीच योजना शासनाची नसून नागरिकांनी याला बळी पडू नये असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
अधिक वाचा : गोमांस विक्री करनेवाले आरोपियों की जमानत याचिका खारिज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola