भारतात लॉन्च झाले ब्लॅकबेरी चे हे स्मार्टफोन्स– Evolve आणि Evolve X
BlackBerry ने दिल्लीमध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये कंपनीने आज आपली दोन नवीन मॉडेल्स दाखल केली आहेत. हे दोन्ही फोन अॅंड्रॉईड ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे असून ते कंपनीच्या नोएडामध्ये तयार केले जाणार आहेत. तंत्रज्ञानाने अद्ययावर असणाऱ्या या फोनमध्ये ड्युएल रियर कॅमेरे, वायरलेस चार्जिंग सुविधा आणि डॉल्बी सराऊंड साऊंड सिस्टीमसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. BlackBerry Evolve ची किंमत २४,९९० रुपये असून हा फोन सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होणार आहे. तर BlackBerry Evolve X या फोनची किंमत ३४,९९० रुपये असून हा फोन ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत अॅमेझॉनवर दाखल होणार आहे.
या दोन्ही मोबाईलच्या खरेदीवर रिलायन्स जिओची ३९५० रुपयांची कॅशबॅक ऑफरही मिळणार आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर फोन खरेदी केल्यास ५ टक्के त्वरीत कॅशबॅक मिळणार आहे. BlackBerry Evolve मध्ये ५.९९ इंचाची फुल एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ सारखे फिचर्सही देण्यात आले आहेत. तसेच या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर देण्यात आला आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले असून २५६ जीबीपर्यंत ते वाढवता येऊ शकते. १३ मेगापिक्सलचे २ रियर कॅमेरा तर १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. ४ हजार मिलीअॅम्पियर्सची बॅटरी देण्यात आली आहे. अँड्रॉईड ८.१ ओरियो ऑपरेटींग सिस्टीमवर हा फोन चालतो.
BlackBerry Evolve X या फोनलाही ५.९९ इंचाची फुल एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ सारखे फिचर्सही देण्यात आले आहेत. तसेच या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर देण्यात आला आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले असून ते २ टीबीपर्यंत वाढविता येते. १३ मेगापिक्सलचे २ रियर कॅमेरा तर १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. ४ हजार मिलीअॅम्पियर्सची बॅटरी देण्यात आली आहे. अँड्रॉईड ८.१ ओरियो ऑपरेटींग सिस्टीमवर हा फोन चालतो.
हेही वाचा : WhatsApp चे नवीन फिचर- ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करता येईल