अकोट ( सारंग कराळे) : सामान्यातला असामान्य साहित्यिक केवळ दीड दिवस शाळा शिकून आपल्या साहीत्यातल्या जीवंत वेदनेने गावगाड्यातील जीवघेणं जगणं प्रस्थापितांपुढे नेवून आदळणारे जागतिक किर्तीचे साहित्यिक शोषित वंचित समाजाचे दुःख रशियापर्यंत पोहोचवणारे आणि आपल्या अनेकविध साहित्यातून त्या दुःखाला वाचा फोडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती…
आज अकोट तालुक्यातील पाथर्डी येथे मातंग समाज मंदिर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठेक्रांती सेनेच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे तथा भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सरपंच मा.श्री.गजेंद्र वसू हे लाभले तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना गटनेता तथा सभापती मनिष रामाभाऊ कराळे व जेष्ठ शिवसैनिक विजू भाऊ ढेपे, श्री.आप्पासाहेब कुकडे, श्री.नितीन बाळापुरे जि.प.सर्कल प्रमुख,श्री.शंभूभाऊ दबळगाव पोलीस पाटील, श्री.मोहोड काका, श्री.संतोष नावकार, श्री.सागर नावकार, श्री.शिव कुकडे, श्री.सुनील नावकार क्रांतिसेना अध्यक्ष, श्री.देवा दांडगे, श्री.रामदास नावकार, श्री.छोटू कुकडे, युवासेना तेल्हारा ता.संघटक बंटी राऊत, अक्षय गावंडे, धीरज खिरोडकार, रॉयल ठाकूर यांची लाभली.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तद्नंतर कु.रेणुका रामदास नावकार ह्या विद्यार्थिनीची गुणवत्तेच्या आधारे अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती साठी निवड झाल्याबद्दल अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले शिवसेनेचे सभापती तथा गटनेते मनिष रामाभाऊ कराळे यांच्या हस्ते विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व मान्यवरांनी क्रमशः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. आज गावातून अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेच्या युवकांनी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी मिरवणुकीत शिवसेना गटनेता मनिष कराळे हे सुद्धा मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते तेव्हा युवकांच्या उत्साहाला उधाण आले होते.यावेळी आयोजक अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे सर्व सदस्य तसेच सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन युवासेना ता.संघटक बंटी राऊत यांनी केले.
अधिक वाचा : तेल्हारा येथे बेवारस स्थितीमध्ये शेकडो सिम कार्ड आढळल्याने एकच खळबळ,पोलिसांची घटनास्थळी धाव
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola