अकोला– रेशन दुकान, अभिलेखाची तपासणी होऊ न देण्यासाठी तीन हजारांंची लाच घेताना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील तालुका पुरवठा निरीक्षकास पकडले. तेथील शासकीय धान्य गोदाम काटीपुरा येथे अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मंगळवारी ३१ जुलैला ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील अकोट येथील वनीवेटाळातील रहिवासी, अंजनगाव सुर्जी पुरवठा निरीक्षक गजानन कृष्णराव शेटे (वय ५५) असे लाचखोराचे नाव आहे.
पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळें मार्फत तक्रारदाराचे रेशन दुकान, अभिलेखांची तपासणी न होण्यासाठी शेटेंनी ३ हजारांंची लाच मागितली होती. त्याची पडताळणी केली गजानन शेटेंनी तक्रारदारास पुरवठा अधिकारी टाकसाळेंकरिता ३ हजारा लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. सापळा रचत अकोला एसीबीने पुरवठा निरिक्षक गजानन शेटेला लाच घेताना पकडले.
हेही वाचा : अकोट शहरातील सराईत गुन्हेगारास घातक हत्यारासह अटक,अकोट शहर पोलिसांची धडक कार्यवाही