अकोट(सारंग कराळे)-अकोट शहर पोलिसांनी मोठी कारवाई करीत, मिळालेल्या माहिती वरून लाखोंच्या गुटख्याची वाहतूक करीत असलेली 2 वाहने दिनांक 31।7।18 च्या रात्री पकडून महाराष्ट्र सरकार ने प्रतिबंधित केलेला लाखोंचा गुटखा व पान मसाला जप्त केली आहे, कदाचित अकोट शहराच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी गुटखा जप्तीची कारवाई आहे। दिनांक 31।7।18 चे रात्री अकोट शहर चे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना खात्रीलायक माहिती मिळाली की अकोल्यावरून अकोट कडे दोन वाहना मधून महाराष्ट्र सरकार ने प्रतिबंधित केलेला गुटखा, व पान मसाला येत आहे, ह्या वरून त्यांनी गुन्हेशोध पथकाचे जितेंद्र कातखेडे, राहुल वाघ, संतोष गावंडे, मंगेश खेडकर, नासिर शेख ह्यांना कारवाईचे आदेश दिले, त्यांनी दबा धरून सदर वाहनांना अकोट शहरात थांबवून त्याची पाहणी केली असता MH 30 AV 0377 ह्या टाटा पिकअप वाहनात व MH30 BD 0785 ह्या टाटा पांढरा हत्ती ह्या वाहनातून महाराष्ट्र सरकार ने प्रतिबंधित केलेला सागर, गुलाम ,वाह , पान बहार, काली बहार, निली बहार, असा सुमारे 8 लाख 4 हजाराचा गुटखा आढळून आल्याने रीतसर पंचनामा करून जप्त करण्यात आला, वाहन क्रमांक MH30 AV 0377 चा चालक शेख आबी द शेख इमदाद, राहणार बेईतपूरा अकोला, व वाहन क्रमांक MH 30 BD 0785 चा चालक फय्या ज बेग गुलाम बेग राहणार शिवणी अकोला ह्यांना चौकशी साठी ताब्यात घेतले , 8 लाखांचा गुटखा व 7 लाखाची वाहने असा एकूण 15 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कार्यवाही साठी अन्न पुरवठा निरीक्षक ह्यांना पाचारण करण्यात येणार आहे.
सदर कारवाही पोलिस अधीक्षक राकेश कला सागर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके व गुन्हे शोध पथकाने केली आहे, अकोट मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त झाल्याने गुटखा माफिया मध्ये खळबळ उडाली असून अकोट शहर पोलिसांच्या धडाकेबाज कार्यवाहीचे सर्व स्तरातून कौतुक होतांना दिसत आहे.
हेही वाचा : आमदार श्री प्रकाशभाऊ भारसाकळे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त ३ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम चे आयोजन