• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने घेतला विषाचा घोट

City Reporter by City Reporter
May 20, 2020
in Featured, अकोला, अकोला शहर, राज्य
Reading Time: 1 min read
80 1
0
मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने घेतला विषाचा घोट
12
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अकोला(प्रतिनिधी)- वाशीम तालुक्यातील 18 वर्षीय युवकाने राहत्या घरात विषाचा घोट घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोहगव्हाण येथे आज 30 जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली. पवन माणिक डुबे असे युवकाचे नाव असून गावकऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी हलविले. यावेळी त्याच्या खिशात आढळून आलेल्या चिठ्ठीवरुन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेवून बलिदान दिले. याघटनेमुळे राज्यभरात मराठा समाजाची आंदोलने सुरू झाली. तर आरक्षणासाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतानाही मराठा समाजातील आंदोलक दिसत आहेत. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात दरदिवशी सुरू असलेले आंदोलने किरकोळ अपवाद वगळता शांततेत सुरु आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा विविध प्रसार माध्यमांनीही लावून धरला आहे. सोमवारी मोहगव्हाण येथील डुबे कुटुंब शेतात गेले होते. घरी एकटाच असलेला पवन दुरचित्रवाणीवर आरक्षणा विषयीच्या बातम्या पाहून आवेशात आला. यातूनच त्याने सायंकाळी 5.30 च्या सुमारास घरात असलेले किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर प्रकार शेजारी राहत असलेल्या नातेवाईकांच्या लक्षात आल्याने गावकऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून तो मराठ्यांच्या आरक्षणावरुन चिंतेत राहत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. तर त्याच्या खिशात आरक्षणासाठीची चिठ्ठीही आढळून आली आहे. याप्रकरणी पोलिसांत नोंद घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

Tags: MaharashtraMaratha kranti morchaमराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चा
Previous Post

तेल्हारा ब्रेकिंग न्युज -तेल्हारा येथील सुप्रसिध्द कसबा मंदिरातील हुनुमानाच्या मूर्तीवरील चांदीच्या मुकुटाची चोरी

Next Post

मराठा क्रांती मोर्चा : मराठा तरुणाची आत्महत्या, राज्यातील सातवा बळी

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
अकोला

मराठा क्रांती मोर्चा : मराठा तरुणाची आत्महत्या, राज्यातील सातवा बळी

श्रीकांत किदाम्बी

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांत किदाम्बी दुसऱ्या फेरीत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.