तेल्हारा(शुभम सोनटक्के)- तालुक्यातील सांगवी हिवरे येथील शेतकरी देविदास हिवरे व अविनाश हिवरे हे आपल्या शेतीमध्ये कामानिमित्त आज सकाळी जात असताना त्यांच्यावर अचानक जंगली डुकरांच्या कळपाने अचानक हल्ला चढवला.यामध्ये देविदास हिवरे व अविनाश हिवरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारा करिता पंचगव्हान येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. गावातील पूर्णा नदी कडे जाणाऱ्या रस्त्यावर या डुकरांनि हैदोस माजवला असून शेतकरी व मजूर यांच्या वर हल्ला चढवीत आहेत.त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.