तेल्हारा येथील क्रीडाप्रेमींची क्रीडा संकुल साठी जनजागृती स्वच्छता रॅली
तेल्हारा (विशाल नांदोकार)-शहरातील तालुका क्रीडा संकुल स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी क्रीडा प्रेमिसह ,विद्यार्थ्यांनी आज २७ जुलै ला परिसरामध्ये जन जागृती स्वच्छता रॅली काढून क्रीडा संकुल स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले.
तेल्हारा शहरामध्ये तालुका क्रीडा संकुल स्वच्छ व सुंदर ठेवण्याबाबत क्रीडा प्रेमी व विद्यार्थी प्रयत्न करत आहे परंतु काही जण क्रीडा संकुलच्या परिसरामध्ये उघड्यावर शौच्यास बसत असल्यामुळे क्रीडा संकुल परिसरामध्ये अस्वच्छता पसरली आहे. क्रीडा संकुल स्वच्छ ठेवण्यासाठी क्रीडा प्रेमी व विद्यार्थ्यांनी घरो घरी जाऊन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजनजागृती स्वच्छता रॅली काढून आवाहन करण्यात आले .यावेळी रामभाऊ फाटकर ,सचिन थाटे ,स्वप्नील सुरे ,विशाल फाटकर,गौरव धुळे ,किशोर डामरे ,सुरज देशमुख .प्रज्वल मोहोड , अजय वासनकार ,अमित घोडेस्वार ,सागर इंगळे ,आकाश पवार ,दर्शन महल्ले , आकाश आमटे ,कुणाल देशमुख , अतुल वानखडे निखील वानखडे,स्वप्नील माठे ,चेतन चव्हाण ,संकेत सोनोने,सागर निर्मल ,सागर पवार .साहिल कुरेशी,गणेश वारणकर ,रोषण कुयटे , जितु गांधी,आकाश काटोलकर ,प्रफुल खोडे,राहुल सोनटक्के , शामल पवार ,गौरव भगत ,श्रीकृष्ण गायकवाड ,सागर वानखडे ,अमोल वानखडे ,अमोल वारुलकर ,गणेश घ्यार ,अजय वाघ ,मनोज मानमोडे ,अनिकेत पवार ,गणेश मोलककार इ. क्रीडा प्रेमी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .