अकोट(सारंग कराळे)- शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज अकोट येथील मनिष कराळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते, संपर्क प्रमुख खा.अरविंद सावंत, आ.गोपिकीशन बाजोरिया,
सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर,जिल्हाप्रमुख नितीन बाप्पू देशमुख,मा.आ.संजय गावंडे,महिला आघाडी संपर्क संघटिका सौ.मधुराताई देसाई,
प्रा.सौ.मायाताई म्हैसने मॅडम
यांच्या मार्गदर्शनात…..
२५ वर्षापूर्वी ज्या जेष्ठ शिवसैनिकांनी आपल्या अथक परिश्रमातुन शिवसेना पक्ष वाढीसाठी कार्य केले.त्या काळात तळागाळात शिवसेनेचा पाया मजबूत करण्यासाठी ज्या लोकांनी आपल्या रक्ताचे पाणी केले,कोणत्याही प्रकारचा मोह व अपेक्षा न बाळगता पक्षाशी एकनिष्ठ राहून अहोरात्र शिवसैनिक म्हणून स्व.मा.आमदार रामाभाऊ कराळे यांच्या सोबत रात्रंदिवस काम केले व तालुक्यात शिवसेना मजबूत केली.त्याचप्रमाणे आज स्व.रामाभाऊंच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे पुत्र मनिष कराळे यांनी आजच्या तरुण व जेष्ठ शिवसैनिकांची मोट बांधून शिवसेना पक्षाचा झंझावत कायम ठेवला आहे.आजच्या कार्यक्रमात अकोट तेल्हारा तालुक्यातील बहुसंख्य जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते सर्वप्रथम जेष्ठांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व स्व.रामाभाऊ कराळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर जेष्ठ शिवसैनिक विजय ढेपे यांनी प्रास्ताविक करतांना कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली.त्यानंतर क्रमशः जेष्ठ शिवसैनिकांनी आपले मनोगत व्यक्त करतांना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व मा.उद्धव साहेबांच्या नेतृत्वात संपुर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा झंझावत निर्माण झाला आहे तो खरोखर उल्लेखनीय आहे असे व्यक्तव्य केले.पुढे बोलताना जेष्ठांनी मनिष कराळे यांनी समोर येऊन अकोट मतदारसंघात शिवसेना पक्ष हा कोठेही मागे राहणार नाही असे कार्य करण्यासाठी व पुढील राजकीय सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यानंतर जेष्ठ शिवसैनिकांच्या शुभहस्ते शिवसैनिकांचा सत्कार समारोह संपन्न झाला.यावेळी उपस्थित आदरणीय सत्कारमूर्ती खालीलप्रमाणे….
श्री.शंकरराव ताथोड(शिवसेना माजी ता.प्रमुख तेल्हारा),श्री.पुरुषोत्तम भाऊ गावंडे (तेल्हारा उपतालुका प्रमुख),श्री.सुभाष म्हैसने(माजी अकोट ता.प्रमुख शिवसेना),श्री.साहेबराव भगत(माजी पंचायत समिती सदस्य)श्री.गोवर्धन आवारे (माजी पंचायत समिती सदस्य),श्री.ज्ञानेश्वर ढोले(शिवसेना उपतालुका प्रमुख),श्री.पांडुरंग वालसिंघे,श्री.रमेश केदार(मान.सभापती),श्री.महादेराव इंगळे गुरुजी (हिवरखेड),श्री.सोनलाल मोरे,श्री.टीमु वैराळे,
श्री.प्रमोद टवले,श्री.गोवर्धन म्हसाळ,श्री.विजय ढेपे(माजी उपशहर प्रमुख शिवसेना),शहीद खा पठाण,श्री.योगेश दादा जायले,श्री.भगवंतराव शेंडे,श्री.किसनराव उजिडे,श्री.दिलीपराव तराळे,श्री.सुधाकरराव गावंडे (उपशहर प्रमुख तेल्हारा),शेख इमाम (अडगाव),अन्सार भाई(तंटामुक्ती अध्यक्ष अडगाव बु.)श्री.सोनाजी काजदे,श्री.दिनकरराव ठाकरे,श्री.संजय जायले,श्री.संजय देशमुख,श्री एकनाथ सांगूनवेडे,श्री.सारंगधर सांगोळे(माजी उपतालुका प्रमुख),श्री.राजेंद्र तायडे,श्री.रमेश धामोडे,श्री.रोशन गयधर,श्री.मनिष काका कराळे,
श्री.संजू काका पालखेडे,श्री.राजू भाऊ दाळू,श्री.गोपाल कराळे,श्री.मुकेश ठोकळ,श्री.संतोष मोहोकार,श्री.सुरेश शेंगोकार,श्री.सोपान साबळे(मुंडगाव सर्कल प्रमुख)श्री.सुभाष सुरत्ने (आदिवासी ता.प्रमुख),श्री.संजय देशमुख,श्री.प्रकाश भाऊ गीते उपस्थित होते.तसेच यावेळीश्री.प्रफुल तायडे,श्री.प्रशांत येऊल(मुंडगाव सर्कल प्रमुख),श्री.सोपान पोहरे, श्री.कुणाल कुलट(युवासेना ता.संघटक)श्री.संतोष तायडे,श्री.सतीश किल्लेदार,शिवा रेळे (विद्यापीठ प्रमुख)यांचा सुद्धा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी तथा शेकडो शिवसैनिक उपस्थिती होते.