अकोट(सारंग कराळे)-अकोट येथे सकल मराठा समाजाच्या वतीने स्व, काकासाहेब शिंदे यांना आदरांजली वाहण्यासाठी हजारोच्या संख्येने कँडल मार्च काढण्यात आला, याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून करण्यात आली, सकल मराठा बांधवांनी अत्यंत शिस्तबद्धपणे हातावर काळ्या फिती बांधुन शासनाच्या मराठा आरक्षना बाबत उदासीन धोरणाचा त्रिव निषेध करणात आला, हातामध्ये मेणबत्ती घेऊन शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केले, श्री, छत्रपती शिवाजी महाराज चौक,सोनु, जयस्थभ चौक, याकूब पटेल चौक, केशवराव वेताळ, शनिवार पुरा,यात्रा चौक,व नरसिंग महाराज मंदिराच्या भव्य पटांगणावर हजारोच्या संख्येत काकासाहेब शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करिता प्राणाची आहुती दिली, मराठा समाजासाठी शाहिद झालेल्या, काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही,असा संकल्प सर्व मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला,तसेच जर मराठा समाजाच्या भावनांची दखल शासनाने त्वरीत घेतली नाही, तर अकोट तालुक्यातील मराठा समाज त्रिव लढा पुकारेले असा इशारा यावेळी देण्यात आला, या कँडल मार्च मध्ये सकल मराठा समाजातील शेतकरी, शेतमजूर, सर्व प्रकारचे व्यावसायिक,सर्व स्तरीय नोकर वर्ग, व स्थानिक न, प, चे सर्व पधादिकारी व सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख नेते,व कार्यकर्ते, तसेच मराठा सेवा संघाच्या सर्व शाखा पधादिकारी उपस्थित होते,पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सहकार्य केल्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले.