अकोला-नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट- अर्थात ई नाम प्रणालीत एकाच खरेदीदाराचे नाव घेतल्याने, परिणामी शेतकऱ्याला याेग्य भाव न मिळाल्याचा ठपका ठेवत कृषी उत्पन्न बाजार समितीने एका अडत व्यावसायिकाचा परवाना निलंबित केला. त्यामुळे अडते-व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्रीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असून, बाजार बंद असल्यासारखेच चित्र मंगळवारी पाहावयास मिळाले.
शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी देशपातळीवरील एक बाजार, या संकल्पनेवर आधारीत राष्ट्रीय कृषी बाजार (नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट- नाम) ही प्रणाली सुरु केली अाहे. हरी ई-नाम याेजना केंद्र शासनाने ई-नाम याेजना सुरु केली असून, देशातील मुख्य कृषी बाजारांना संगणकीय प्रणालीने जाेडण्यात येत अाहे. त्याद्वारे राष्ट्रीयस्तरावर शेतमाल खरेदी-विक्रीसाठी व्यवस्था निर्माण हाेऊ शेतमालास याेग्य भाग मिळणे शक्य हाेईल, असा सरकारचा दावा अाहे. या याेजनेची टप्प्या-टप्यात अंमलबजावणी सुरु अाहे. त्यानुसार बाजार समितीत याेजना राबवण्यास प्रारंभ झाला अाहे.
गत आठवड्यात बाजार समितीने एका अडत्यास नाेटीस दिली. त्यानंतर २१ जुलैला परवाना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचा अादेश बजावला. परवाना नियम, सूचनांचे उल्लंघन करुन व्यापार करीत अाहे, असा ठपका अादेश ठेवला. शेतमालास याेग्य दर मिळण्यासाठी ई-नाम प्रणालीत खरेदीदाराचे दर घेणे अावश्यक अाहे. मात्र अडत्याने एका खरेदीदाराचे दर घेतले. त्यामुळे शेतकऱ्यास याेग्य दर मिळाला नसून, हे त्याच्या हितास बाधा पाेहाेचवणारे अाहे, असे अादेशात नमूद केले. ई-नाम प्रणालीबाबत अडते-व्यापाऱ्यांनी बाजार प्रशासनाकडे शासन अादेशाची प्रत मागितली हाेती. त्यानुसार अडते-व्यापाऱ्यांना कृषी पणन मंडळाच्या पत्राची प्रत दिली. यात अडत्यांनी खरेदीदाराचे भाव घेऊन पाेर्टलवर टाकावे, असे नमूद नसल्याचा दावा अडते-व्यापाऱ्यांनी केला. त्यामुळे परवाना निलंबनाची कारवाई याेग्य नसल्याचा दावा अडते-व्यापाऱ्यांनी केला.
हेही वाचा : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद