कुटासा (कुशल भगत)-नाम विठ्ठलाचे घेऊ सारे वारकरी होऊ दिंडी आली दारावरी चला पंढरीला जाऊ भंजन आणि टाळ मृदुंगाच्या तालावर भंजन मंडळ व भावीकांनी हा परीसर विठ्ठलाच्या गजराने दणाणून टाकला आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी मोठ्या उत्साहात दिंडी पालखी व सोहळ्याचे आयोजन करण्यात येते गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात येते पालखी सोहळ्याला सुरुवात झाली की येथील मोठ्या प्रमाणात भाविक वारकरी व परिसरातील भंजन मंडळी होतात व विठु माऊली तु माऊली जगाची विठु माझा लेकरूवाडा विठ्ठलाच्या पायी विठ्ठ झाले भाग्यवंत आदि भंजन मंडळी विठ्ठल नामाचा गजर करीत होते या परीसरात दिंडी यात्रा पालखीची विविध ठिकठिकाणी पुजा आर्चना करण्यात आली या प्रसंगी ठिकठिकाणी दिंडी यात्रा पालखीचे जोरदार स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती सायंकाळी विठु माऊली च्या मंदिरामध्ये येऊन पालखी यात्रेचे समापण करण्यात आले गावातील आदि भाविक व समस्त रेलकर परिवार सुद्धा प्रमुख्याने उपस्थित होते