अकोला(प्रतिनिधी)-आषाढीवारी यात्रे निमित्य पाचवर्षापासुन पंढरपुर येथे भाविकांच्या रक्षणासाठी व सेवेसाठी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान या वर्षी सुद्धा चंद्रभागा नदीपात्रात सज्ज आहेत. शोध व बचाव साहीत्त्यासह पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात पथकाचे 27 जिवरक्षक सज्ज आहेत आषाढीवारी कालावधीत चंद्रभागा नंदीपात्रात दगडीपुल ते विष्णुपद घाट व वाळवंट परीसरात उद्भणाऱ्या कुठल्याही स्वरुपाच्या आपत्तीचा सामाना करण्यासाठी आंम्ही शोध व बचाव साहीत्यासह आणी रेस्क्यू रुग्णवाहीकासह सर्च & रेस्क्यू ऑपरेशनसाठी तयार असल्याचे पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी सांगितले आहे.
चंद्रभागा नदीपात्रात रेस्क्यू बोट च्या सहाय्याने संपूर्ण नदीपात्रातील घाट आणी पुंडलीक महाराज मंदीर परीसरावर आम्ही नजर ठेऊन आहोत. 22 जुलै रोजी 11 वाजताच्या दरम्यान चंद्रभागा नदी पात्रातुन दत्तघाटावरुन पुंडलिक महाराज मंदीराकडे पोहत येत असलेल्या सात भावीकांपैकी एकजण नदी पात्राच्या मध्यभागी येऊन थकला. तेवढयातच क्षणाचाही विलंब नकरता चौफाळयावर तैनात असलेल्या गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या जवानांनी रेस्क्यू बोट त्या युवकाजवळ नेली आणी जिवरक्षकांनी त्याला बोटमधे घेतले.यामुळे या वारकरी भक्ताचे प्राण वाचले. यावेळी याभावीकाला रेस्क्यू करतांना माऊली माऊली पाव माऊली भक्ताला तार माऊली असा गजर उपस्थित वारकरी भक्तांनी करीत असतांना. यावेळी हा गजर आमच्या कानी पडताच आमच्यामध्ये एक वेगळी उर्जा आणी भावना निर्माण झाली. हे येथे उल्लेखनीय आहे.असे भावनिक उदगार पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी काढले. याच पद्धतीने दुसर्या वारकरी भक्ताला म्हसोबा घाटाजवळुन वाचविले आहे. सुनील विलास पाटील रा. बत्तीसशिराळा येथील असल्याचे समजले.
तीन दीवसापासुन एकुण आठ वारकरी भक्तांना वाचविण्यात यश आले आहे. तसेच 23 जुलै रोजी एक वारकरी दुपारी अं.तीन वाजता दत्त घाटाजवळ चंद्रभागेत बुडत असतांना रेस्कयु बोटमध्ये तैनात असलेले पथक प्रमुख दीपक सदाफळे यांची नजर त्या वारऱ्याकडे गेली आणी लगेच आपल्या सहकाऱ्याला बोट त्या घेण्याचे सांगीतले व शेवटाचा क्षण डुबण्याचा तेवढयातच दीपक सदाफळे यांनी त्या वारकऱ्याच्या मागील बाजुने डोक्याचे केस पकडले आणी लगेच पथकाच्या जवानांनी बोट मध्ये घेतले अगदी शेवटचा श्वास घेण्याआधीच आंम्ही त्या वारकरी भक्ताला वाचविण्यात यशस्वी झालो. हा वारकरी झानदेव कृष्णा कांबळे रा.चिकोडी जि. बेळगाव येथील असल्याचे त्या वारकरीने सांगितले. तसेच आज 24 जुलै रोजी दुपारी तीन वाजता इस्कॉन घाटा जवळील चंद्रभागेत मध्यभागी येऊन एक ईसम बुडत असतांना पाहताच भाविकांनी जोराजोराने आरडा ओरड केली असता लगेच नदीपात्रात रेस्क्यू बोटवर तैनात असलेले दीपक सदाफळे यांनी एका मीनटातच आपली बोट त्या बुडत असणाऱ्या व्यक्ती जवळ नेऊन लगेच त्या ईसमाला बोटीत घेतले आणी त्या ईसमाला जिवनदान दीले.
या आषाढी वारी दरम्यान गाडगेबाबा पथकाची व पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांचे सहकाऱ्यांचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समीती तर्फे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे दीपक सदाफळे यांच्या चार वर्षाची यशस्वी नियोजनबद्ध आपत्ती व्यवस्थापनाची कामगिरी पाहुन विठ्ठल रुक्मिणी मंदीर समीती पंढरपूर यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे पथकाच्या जिवरक्षकांचा भव्यसत्कार करण्याचे आयोजन आज 24 तारखेला करण्याचे ठरले आहे. अशी माहिती वि.रु.मं.स.पंढरपुर चे अध्यक्ष मा.डाॅ.अतुलजी भोसले साहेब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सचिनजी ढोले साहेब यांनी सांगितले आहे. अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.