अकोट (सारंग कराळे)- विदर्भ संपर्क प्रमुख मा.दिवाकर रावते, शिवसेना आकोला संपर्क प्रमुख मा.खा.अरविंदजी सावंत, मा.आ.गोपीकीशनजी बाजोरीया, सहसंपर्क प्रमुख श्रीरंदादा पिंजरकर,जिल्हाप्रमुख नितीनजी देशमुख,मा.आ.संजय गावंडे, महिला संपर्क प्रमुख सौ.मधुराताई देसाई व विधानसभा संपर्क प्रमुख मा.भास्कर ठाकुर,महीला आघाडी जिल्हा संघटीका प्रा.सौ.मायाताई म्हैसने यांच्या मार्गदर्शनात तसेच सभापती मनिष कराळे यांच्या नेत्तृत्वात आज मुख्याधिकारी अकोट यांना निवेदन देण्यात आले.
अकोट शहरातील विविध समस्याबाबत लक्ष वेधुन त्या तातडीने सोडविण्यासाठी हे निवेदन देण्यात आले.यामध्ये
शहरातील प्रमुख मार्ग व गणगणे विद्यालयाजवळील रोड कीत्येक दिवसापासुन प्रलंबित आहे.या रोड चे घोडे कोठे अडले आज रोजी या रस्त्याची अवस्था खुप वाईट आहे या रोडवरुन जवळपास दोन हजार विधार्थी विधार्थीनी व नागरीक यांचे जाणे येणे आहे.त्यांना आज चिखलातुन मार्गक्रमन करतांना नरकयातना सोसाव्या लागतात याची पुर्णपणे न.पा.प्रशासन जबाबदार आहे. तसेच शहरातील मुख्य रोड आकोला नाका ते कालंका चौक पर्यत्त रोड सर्व प्रशासकीय प्रक्रीया पुर्ण असतांना या बाबत अनेक तक्रारी उपोषण झाले पण रोड मात्र झाला नाही याला कोणता विकास म्हणायचे हे कळत नाही.नरसिंग महाराज रोडवर एक जिवघेणा खड्डा आहे. या रोडवरुन सुद्धा हजारो लोक आपला जिव धोक्यात घालुन मार्गक्रमण करतात पण या कडे मात्र न.पा.प्रशासनाला लक्ष दयाला वेळ नाही.तसेच गजानन नगर मधील फ्रीडम शाळेजवळ जाणार्या रोडची अवस्था फार बिकट झाली आहे सर्व प्रशासकीय प्रक्रीया पुर्ण असतांना हा रोड का होत नाही याला सुद्धा न.पा.प्रशासन जबाबदार आहे वरील सर्व रोडची समस्या लवकरच सोडवा अन्यथा न.पा. प्रशासनाच्या विरुद्ध शिवसेना अनोखे आंदोलन छेडेल त्याबरोबरच शहरातील सांडपाणी वाहुन नेण्यास न.पा.प्रशासनाने कोणतीही उपाय योजना केली नाही त्यामुळे आता पावसाळा सुरू असतांना अनेक भागात पाणी नदयाप्रमाणे साचले जाते. पदचारी नागरिकांना, दुचाकी,चारचाकी वाहनांना मशक्कत करावी लागत आहे.पावसाळयात शहरात ठिकठिकाणी कचरा साचला आहे अशा प्रकारे आकोट शहर समस्याचे माहेर घर बनले आहे सत्ताधारी आणी न.पा.प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेवुन आहेत. त्यांना जागी करण्यासाठी, जनतेच्या समष्या सोडविण्यासाठी शिवसेना रस्तावर उतरली आहे.शिवसेना आज निवेदन देवुन लोकशाही पद्धतीने आपले कार्य करीत आहे जर लोकशाही आणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करुनही सत्ताधारी न.पा.प्रशासन झोपेतुन जागी होवुन जनतेच्या व आकोट शहराच्या समस्या सोडविण्यात अपयशी झाले तर यानतंर शिवसेना आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार.त्याची सर्वस्व जबाबदारी ही न.पा. प्रशासनाची राहील असा इशारा न.पा.सभापती मनिष कराळे यांनी दिला आहे….