अकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत 8 कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या डाबकी रेल्वे गेट ते अमानतपूर, सांगवी मोहाडी, मानकापकूर, ते अकोटकडे जाणारा मुख्य रस्त्यांची पाहणी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केली. येत्या मे महिन्यात तयार करण्यात आलेल्या या रस्तात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या रत्यांवरील डाबरीकोटींग निघून गेलेले आहेत. हे काम अत्यंत निष्कृट दर्जाचे झालेले आहेत. या कामाची पाहणी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज केले. या कामाचे त्वरीत तांत्रिक लेखा परिक्षण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. सदर काम गुणवत्तापूर्वक व निकषाप्रमाणे झाले आहे किंवा नाही याची खातरजमा करावी तसेच संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करून त्याचे उर्वरित पेमेंट करू नये, असे निर्देश पालकमंत्री यांनी दिलेत. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, जगन्नाथ ढोणे, माजी नगराध्यक्ष हरीश अलिमचंदाणी, डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक आशिष पवित्रकार, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपसिथत होते.
तत्पुर्वी पालकमंत्री यांनी जापानी जीम जवळ सिमेंट पाईप तुटल्यामुळे गणेश मार्गावरील रस्ता खराब झालेला आहे. त्याची दुरूस्ती त्वरीत करण्याच्या निर्देश महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. कृषि नगर मधील खुल्या मैदानातील साचलेले घाण पाणी लोकांच्या घरात शिरत असल्याचे नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या निदर्शनात आणून दिलेत. तसेच प्रभात किड्स जवळील रस्तांवर पावसाचे पाणी साचलेले आहे त्यामुळे ट्युशनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ही बाब नगरसेवक पवित्रकार यांनी पालकमंत्री यांच्या निदर्शनात आणून दिली. याबाबत त्वरीत महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून समस्या 8 दिवसाच्याआत सोडवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत. यावेळी महानगरपालिकांचे कार्यकारी अभियंता श्री. गुजर व शहर अभियंता श्री. खान प्रामुख्याने उपस्थित होते.