पंढरपूर- यंदा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठलाच्या शासकीय महापुजेचा मान मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी हिंगोली येथील जाधव दांम्पत्याला देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील भगवती गावातील (तालुका-शेणगाव) सौ. वर्षाताई आणि श्री अनिल गंगाधर जाधव या शेतकरी दाम्पत्याने आज माऊलीची शासकीय महापूजा केली, वारकरी दांम्पत्याच्या हातून पाहाटे साडे 3 वाजेच्या सुमारास विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली. यावेळी शासनाच्या वतीने पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दिवाकर रावते, बबनराव लोणीकर आणि बबनराव पाचपुते उपस्थित होते.
पहिल्यांदाच वारकऱ्याच्या हातून महापूजा….
दरवर्षी मुख्यमंत्र्यांबरोबरच रांगेतील पहिल्या वारकरी जोडप्यालाही पुजा करण्याचा मान मिळत असतो. मात्र यंदा मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत फक्त या जोडप्याच्याच हस्ते शासकीय महापुजा करण्यात आली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola