अकोला दि. 21 :- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून शहराचे वैभव असणा-या मोर्णा नदीची स्वच्छता करण्यात आली आहे. लोकसहभागातुन ही नदी मोठया प्रमाणात स्वच्छ झाली आहे. मोर्णा स्वच्छते बरोबरच जिल्हा प्रशासनाने मोर्णाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मोर्णा काठावर घाट बांधण्याचे काम सुरू आहे.तसचे मोर्णा नदीच्या दोन्ही काठावर सौर उर्जेचे दिवे लावण्यात आलेले आहे.
आता या मोर्णा काठावर लक्झरी बसस्टँडच्या मागे एक शहीद स्मारक उभारण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. त्या जागेची नियोजन व पाहणी आज दि. 21 जुलै रोजी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डये यांनी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय खडसे, पुर्नवसन अधिकारी अतुल दौड, विभागीय वनीकरण अधिकारी विजय माने, तहसिलदार विजय लोखंडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजीक वनीकरण विभागातर्फे मोर्णा नदीच्या काठावर सुंदर असा बगिचा तयार करण्यात येणार आहे. तसेच या बगिच्यात जिल्हयात शहीद झालेल्या विरपुत्राचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या तसेच मोर्णाच्या सौदर्यांत निश्चितच भर पडणार आहे.