अकोला दि. 21:- शहरातील रस्ते विकास कामासाठी जिल्हयातील लोकप्रतिनीधी यांनी शासनाकडून अकोला शहरातील रस्ते व महानगरपालीका अकोला यांच्या नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष अर्थसहाय्य योजनेतंर्गत तयार करण्यात आलेल्या सिमेंट क्रॉक्रींट व इतर रस्त्यांचे सोशल ऑडीट दि. 22 जुलै पासून सुरू होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.
आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात सोशल ऑडिटची पुर्व तयारी करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोशल ऑडिटचे नोडल ऑफीसर तथा उपविभागीय अधिकारी संजय खडसे, पुर्नवसन अधिकारी अतुल दौड, तहसिलदार विजय लोखंडे, शिवाजी इंजिनीअरींग कॉलेज, सिपना इंजिनीअरींग कॉलेज अमरावती व गर्व्हमेंट इंजिनीअरींग अमरावतीचे तज्ञ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी , पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच इंजीनीअरींग कॉलेजचे विदयार्थी उपस्थित होते.
शहरातील रस्ते विकास कामासाठी जिल्हयातील लोकप्रतिनीधी यांनी शासनाकडून अकोला शहरातील रस्ते व महानगरपालीका अकोला यांच्या नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष अर्थसहाय्य योजनेतंर्गत तयार करण्यात आलेल्या सिमेंट क्रॉक्रींट रस्त्यांचे ऑडीट करण्यासाठी 3 तज्ञ टिम , जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांची टिम व ज्येष्ठ नागरीकांची यांची टिम तयार करण्यात आलेली आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांची टिम व ज्येष्ठ नागरीकांची यांची टिम मार्गदर्शन व देखरेख करणार आहे.
शिवाजी इंजिनीअरींग कॉलेज व सार्वजनिक बांधकाम विभागातील तज्ञ यांची एक टिम , सिपना इंजिनीअरींग कॉलेज अमरावती व पाटबंधारे विभागातील तज्ञ यांची एक टिम आणि गर्व्हमेंट इंजीनिअरींग कॉलेजचे तज्ञ तसेच या तिन्ही कॉलेजचे विदयार्थी यांच्या 3 टिम व्दारे रस्त्यांचे सोशल ऑडीट करण्यात येणार आहे. सदर टिम विविध ठिकाणी मार्किंग करून स्मॅपल एकत्रित करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविणार आहे. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
शहरातील रस्ते विकास कामासाठी जिल्हयातील लोकप्रतिनीधी यांनी शासनाकडून अकोला शहरातील रस्ते व महानगरपालीका अकोला यांच्या नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष अर्थसहाय्य योजनेतंर्गत निधी प्राप्त् झालेला आहे. शासनाकडुन खड्डेमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत शहरातील रस्ते क्राँक्रीटीकरण करण्यात येत आहे. परंतु शहरातील मागील एका वर्षात क्राँकीटीकरण तयार केलेले रस्ते जागोजागी खराब झाल्याचे दिसून येत आहे. ही बाब प्रशासकीय कामकाजाला शोभणारी नसुन यामुळे जनसामान्यामध्ये शासनाची प्रतिमा मलिन होत आहे.
ही सर्व परिस्थीती विचारात घेवून तसेच अकोला शहरात शासनाच्या वैशिष्टपुर्ण निधीतुन होणारे सर्व रस्ते गुणवत्तेप्रमाणे पुर्ण होणे आवश्यक आहे. त्याकरीता शहरात सुरू असलेल्या , पुर्ण झालेल्या रस्त्यांचे सोशल ऑडीट करणे गरजेचे आहे. सोशल ऑडीट करतांना नियमाप्रमाणे पारदर्शक व लोकाभिमुख पध्दतीने होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाप्रशासनाकडून याकामासाठी करण्यात येणा-या सोशल ऑडीट कामासाठी तयार करण्यात येणा-या पथकामध्ये विविध इंजिनीअरींग कॉलेजचे तज्ञ , सार्वजनिक बांधकाम विभागाचे तज्ञ तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व ज्येष्ठ नागरीक यांची मदत घेण्यात येत आहे.