तेल्हारा .दि-२०( शुभम सोनटके)- तेल्हारा शहरातील तालुका क्रीडा संकुल येथील धाव पट्टी सह झालेली दुरवस्था दूर करण्याबाबत युवासेने सह विद्यार्थ्यांनी आज २० जुलै ला तहसील दार तेल्हारा यांच्या मार्फत राज्याचे नगर विकास मंत्री तथा जिल्हाचे पालक मंत्री ना .डॉ रणजीत पाटील यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली .
तेल्हारा तालुक्यातील शहरामधील तालुका क्रीडा संकुल चे काम अनेक वर्षा पासून कासव गतीने सुरु आहे त्यामुळे क्रीडा क्षेत्रात तरुणांना वाव मिळू शकला नाही तसेच , पोलीस भरती , सैनिक भरती मध्ये शाररीक चाचणी सराव करण्याकरिता तालुका क्रीडा संकुल मध्ये आवश्यक असलेल्या सुविधा धाव पट्टी , गोळाफेक , लांब उडी , उंच उडी ,सिंगल बार , डबल बार , आवर भिंत, विद्युत व्यवस्था उपलब्ध नाहीत . तसेच क्रीडा संकुल मधील धाव पट्टी ची सुद्धा अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे युवक व युवतींना नाईलाजस्तव शहरातील रस्त्या वरून धावावे लागते .त्यामुळे अनेक युवकांचे अपघात झालेले आहेत . तरी क्रीडा संकुल मधील धाव पट्टी प्राधान्याने दुरुस्थ करून तरुणांना धावण्या करिता विना विलंब उपलब्ध करून द्यावी तसेच इतर सर्व सोयी युक्त क्रीडा मैदान उपलब्ध करून द्यावे व क्रीडा संकुल मध्ये बाधण्यात आलेला बॅट मिंटन हॉल, व्यायामशाळा मध्ये साहित्य उपलब्ध करून देण्यात याकरिता युवासेने सह विद्यार्थ्यांनी पालक मंत्र्यांकडे निवेदन सादर केले .
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड ,शहर प्रमुख विक्रांत शिंदे , रामभाऊ फाटकर ,माजी शहर प्रमुख राजेश वानखडे ,पप्पूसेठ सोनटक्के , माजी युवासेना तालुका प्रमुख निलेश धनभर. प्रवीण वैष्णव ,युवासेना तालुका प्रमुख जयवंत चिकटे , युवासेना शहर प्रमुख सचिन थाटे , बंटी राऊत , राम वाकोडे मुन्ना पाथ्रीकर , सदगुरु अकोटकर , आशिष शेळके , भैया देशमुख , विशाल फाटकर , स्वप्नील सुरे , किशोर डामरे ,सुरज देशमुख , राहुल पुदाखे , प्रज्वल मोहोड , विशाल नादोकार सागर इंगळे , गौरव धुळे ,सुरज काईगे ,अमित घोडेस्वार , वैभव देशमुख , आकाश पवार ,रोहित अग्रवाल ,गोविंद फुलवंदे ,वैभव कुचके आदेश महल्ले ,स्वप्नील इंगळे ,सौरभ कापसे ,प्रसाद देशमुख विशाल देशमुख, अक्षय गावंडे इत्यादी युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकते व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .असे युवसेनेंचे प्रसिद्धी प्रमुख विशाल नांदोकार यांनी कळविले आहे
( सेनेच्या माजी आमदारासह पदाधीकार्यांनी केली क्रीडा संकुल ची पाहणी
( क्रीडा संकुल ची झालेल्या दुरवस्था दूर करण्याबाबत युवासेनेने पालक मंत्राकडे मागणी करताच शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे ,संपर्क प्रमुख भास्कर ठाकूर, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख ,उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर , उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे ,डॉ विनीत हिंगणकर , मुकेश मुरूमकार , आदींनी क्रीडासंकुल ची पाहणी करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांना विनाविलंब क्रीडा संकुल मधील धावपट्टी सह इतर कामे त्वरित करण्याबाबत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून सूचना केल्या )