तेल्हारा(शुभम सोनटक्के) – गेल्या दोन वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा आयोजित केला होता.मागण्या पूर्ण होत नसल्याने सकल मराठा समाजाने मराठा क्रांती मूक मोर्चा न काढता आता मराठा ठोक मोर्चा चे आयोजन केले असून या मोर्चाला तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून पाठींबा जाहीर करण्यात आला त्याबाबतचे आज तेल्हारा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे.मागण्या पूर्ण न होत असल्याने ठोक मोर्चा चे आयोजन करण्यात येत असून शासनाने त्वरित मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा तालुका स्तरावर ठोक मोर्चा चे आयोजन करण्यात येईल.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे शेकळो बांधव उपस्तिथ होते.









