भारताच्या ध्वजातून ‘अशोक चक्र’ गायब!
इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये शनिवारपासून महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा सुरु होणार आहे. आयोजकांनी स्पर्धा सुरु होण्याआधी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी हॉकी इंडियासह संपूर्ण देशवासीयांची नाराजी ओढवून घेतली आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 16 संघांच्या कर्णधारांना थेम्स नदीच्या किनारी एका कार्यक्रमासाठी बोलवले होते. या कार्यक्रमास भारताची कर्णधार राणी रामपाल देखील उपस्थित होती. प्रत्येक कर्णधार स्वत:च्या देशाच्या ध्वजासह उभी होती. यात सर्व देशांचे ध्वज बरोबर होते. पण भारताच्या ध्वज मात्र चुकीचा होता. आयोजकांनी भारताच्या ध्वजातून अशोक चक्रच काढून टाकले होते.
भारताच्या ध्वजामध्ये झालेल्या इतक्या मोठ्या चुकीबद्दल येथे उपस्थित असलेले भारतीय अधिकारी आणि खेळाडूंना काही माहिती दिली आहे की नाही याबद्दल अद्याप कळू शकले नाही. तसेच भारतीय अधिकाऱ्यांनी ही चुक आयोजकांना दाखवून दिली का हे ही अद्याप समजले नाही.
विश्वचषक स्पर्धेत भारत यावेळी ब गटात आहे. भारताचा पहिला सामना इंग्लंडविरुद्ध 21 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर 26 जुलै रोजी आयर्लंड आणि 29 जुलै रोजी अमेरिकेविरुद्ध भारताची लढत होणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ही 1974मध्ये झाली होती. तेव्हा भारतीय संघाने चौथे स्थान मिळवले होते.
अधिक वाचा : आयसीसी वनडे रँकिंग: कोहली चे अव्वल स्थान कायम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola