• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट शहरात श्री शक्तीचा जागर, जननी-२ जनजागृती मोहिमेला प्रचंड प्रतिसाद

City Reporter by City Reporter
May 25, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
80 1
0
अकोट शहरात श्री शक्तीचा जागर, जननी-२ जनजागृती मोहिमेला प्रचंड प्रतिसाद
12
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (सारंग कराळे)-अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश कला सागर व अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजयकांत सागर ह्यांचे संकल्पनेतून साकारलेल्या जननी2 मोहिमे अंतर्गत पोलिस स्टेशन अकोट शहर तर्फे आयोजित जननी2 जनजागृती अभियानास अकोटातील श्रीशक्ती ने दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाने एखाद्या शासकीय खात्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडून जवळपास 1200 ते 1500 महिलांची व मुलींची गर्दी ह्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले, अकोट शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 12।7।18 पासून अकोट शहरात जननी2 ही मोहीम सुरू आहे,त्या अंतर्गत शहरातील बहुतेक सर्व शाळा ,महाविद्यलयातून सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर,सुरज निंबाळकर , ह्यांनी जाऊन विद्यार्थिनींना कायदा व सुरक्षा ह्या विषयावर मार्गदर्शन केले तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, उपनिरीक्षक शिंदे, गवई, ह्यांनी मोहल्या मध्ये जाऊन कॉर्नर मीटिंग घेतल्या, ऑटो चालक, बालक पालक मीटिंग, पथ नाट्य, मार्शल आर्ट प्रदर्शन ईत्यादी भरगच्च कार्यक्रम पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आले त्या नंतर आज दिनांक 19।7।18 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य सभागृहात जननी2 जनजागृती अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर हे होते व प्रमुख मार्गदर्शक म्हणून अकोल्याच्या माजी राज्य महिला आयोग सदस्या डॉक्टर आशाताई मिरगे ह्या उपस्थित होत्या.

प्रमुख उपस्थिती मध्ये अकोट उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, तहसीलदार विश्वनाथ घुगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव माळवे, हे उपस्थित होते तसेच विभागातील अकोट ग्रामीण चे पोलिस निरीक्षक मिलिंद बहाकार, हिवरखेड चे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ पवार, तेल्हारा चे पोलिस निरीक्षक देवरे, दहीहंडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देशमुख हे हजर होते,प्रारंभी द्वीपप्रज्वलन करून व सावित्रीबाई फुले व मा जिजाऊ ह्यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात झाली, अकोट शहर चे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी प्रास्ताविक करून जननी2 मोहीम राबविण्या मागची पोलिसांची भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?


त्या नंतर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर आशा ताई मिरगे ह्यांनी महिला सुरक्षा व महिला वरील होणारे विविध अत्याचार, व महिलांच्या विविध समस्या व त्या वरील उपाय योजना ह्यावर आपल्या मार्गदर्शनातून प्रकाश टाकला तसेच अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर ह्यांनी जननी2 मोहीम राबविण्याचा उद्देश व जिल्ह्यात मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद ह्यावर भाष्य केले, उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत ह्यांनी सुद्धा जननी2 मोहिमे बाबत मत मांडून एवढी चांगली मोहीम राबवित असल्या बाबत पोलिस विभागाचे कौतुक केले, त्यानंतर ज्या महिलांनी विपरीत परिस्थितीशी दोन हात करून स्वतः ला व आपल्या मुलांना एक वेगळ्या उंचीवर नेले व समाजासाठी सुद्धा मोलाचे योगदान दिले पण आता पर्यंत दुर्लक्षित होत्या अश्या 5 रणरागिनींना शोधून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, ज्या मध्ये अकोट येथील श्रीमती अनघा सोनखासकर, ज्यांनी पती निधनानंतर सुद्धा जिद्दीने एक मुलगा व एक मुलगी ह्यांना उच्च शिक्षण दिले व स्वतः उच्च शिक्षित असून डॉक्टरेट मिळवली व सामाजिक कार्य सुद्धा केले, पोलिस स्टेशन अकोट शहर येथे कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर (कोरडे) ह्यांनी स्वतः ला लहान मूल असूनही व पोलिस सारख्या व्यस्त खात्यात काम करूनही कायद्याची पदवी मिळवून आणखी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न केले,श्रीमती शिलाबाई गजानन जांबूशिवा ले राहणार नंदीपेठ अकोट ह्याचे पती जायबंदी झाल्या नंतर धीराने संसाराचा डोलारा सांभाळून बचतगटाच्या माध्यमातून भरीव काम करून मुलीला उच्च शिक्षित केले, तसेच सविताबाई सुरेश पंचबुद्धे राहणार हिवरखेड व लीलाताई राजेंद्र रंडे राहणार हिवरखेड ह्यांनी बचत गटांच्या माध्यमातून भरीव काम केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच पोलिसांच्या समउपदेशनातून आपले संसार वाचविणाऱ्या 10 जोडप्याचा मान्यवरांच्या हातून सत्कार करण्यात आला त्या नंतर पथनाट्य , मार्शल आर्ट, व महिला अत्याचार संभधाने क्लिप दाखवून उपस्थित महिला व मुलीचे प्रबोधन करण्यात आले, कार्यक्रमाचे संचालन श्रीमती अनघा ताई सोनखासकर ह्यांनी केले, सदर कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलिस उपनिरीक्षक शरद माळी, महेंद्र गवई, आशिष शिंदे,पोलिस स्टेशन अकोट शहर चे कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले।

Previous Post

राज्यातील मेगा नोकर भरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण: मुख्यमंत्री

Next Post

अकोट पाटील वेल्फेअर ग्रुप च्या वतीने आज स्थानिक शिवाजी चौक अकोट येथे वाहतूक पोलिसांसाठी निवारा

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
अकोट पाटील वेल्फेअर ग्रुप च्या वतीने आज स्थानिक शिवाजी चौक अकोट येथे वाहतूक पोलिसांसाठी निवारा

अकोट पाटील वेल्फेअर ग्रुप च्या वतीने आज स्थानिक शिवाजी चौक अकोट येथे वाहतूक पोलिसांसाठी निवारा

देवेंद्र फडणवीस

राज्याच्या विकासासाठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.